शेती तार कुंपन अनुदान : नमस्कार मित्रांनो आपले शेतकरी बांधव शेतीमध्ये दिवस-रात्र कष्ट करतात. कष्ट करून शेती पूर्ण होतात. त्यानंतर शेतीमध्ये जंगल किंवा पाळीव प्राणी किंवा इतर वन्यजीव शेतातील उभ्या पिकाच्या प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान करून हाती आलेलं पीक वाया जातो, नुकसान होते.
आता हेच नुकसान टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शेतीने तार कुंपण अनुदान देण्याची योजना Wire Fencing Subsidy Scheme सुरू केली आहे. या योजनेमुळे शेतीतील नुकसान टाळायला येईल मदत होणार आहे.
या योजनेअंतर्गत शेतीसाठी काटेरी तारेचे कुंपण करण्यासाठी 90 टक्के अनुदान देखील दिले जाते या संदर्भातील अर्ज कसा करावा या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत ते पुढील प्रमाणे.
तार कुंपण अनुदान योजना
आपल्याला माहिती आहे की शेतीतील पिकाचे वन्यप्राणी, पाळीव प्राणी किंवा जंगलातील प्राण्यांकडे नुकसान होते व हाती आलेले पीक याचा नुकसान होते. हेच नुकसान टाळण्यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वन्य विकास प्राप्ती व्याघ्रा प्रकल्प योजनेअंतर्गत शेतीला काटेरी कुंपण करून घेता येते यामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना कुंपण करण्यासाठी 90% पर्यंत अनुदान Wire Fencing Subsidy Scheme देखील दिले जाते योजना शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर व लाभदायक आहे.
योजनेचे प्रमुख उद्देश
शेती कुंपण अनुदान योजना या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे शेतकरी बांधव आपल्या शेताला तर कुंपण करून कष्टाने पिकवलेल्या पिकाचे वन्यपणापासून संरक्षण करून शेतीला चालना देणे हा आहे. या योजनेतून विकासाला चालना मिळून उत्पादकता आणि पर्यायी रोजगार याच्या संधी वाढतील. या योजनेच्या माध्यमातून वन्यजीव आणि मनुष्य यांच्यातील होणारा संघर्ष सुद्धा टाळला जाणार आहे . मानव आणि वन्यजीव यांचे दोघांचे जीवन याच्यामुळे वाचवता येणार आहे.