water pump problem विहिरीवरची मोटर सारखी जळत असेल तर त्यामधील आहे कारणे .

WhatsApp Group Join Now
Join Now

water pump problem विहिरीवरची मोटर सारखी जळत असेल तर त्यामधील आहे कारणे .

नमस्कार शेतकरी बंधूंनो व भगिनीनों सध्या शेतीवरील सर्व काम ही दूरवर असणारे विहिरीतील मोटार किंवा एखाद्या तलावात किंवा अन्य ठिकाणी असणाऱ्या विद्युत पंपावर अवलंबून असते. शेतातील कामे करून घेण्यासाठी अनेक वेळा आपण लाईटवर अवलंबून असतो यासाठी आपण अनेक उपाय करतो .

सध्या वीज दाब सतत कमी जास्त होत  असतो . यामुळे आपल्याला मोटार जास्त वीज भार पडून ही मोटार जळते  आणि खराब होत  असते . पिकांना पाणी देण्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रमाणात विद्युत पंपाचाच वापर करतो.आणि ऐन वेळेस विद्युत पंप सुरू करायच्या वेळेसच जळते आणि आपल्याला पिकांना वेळेत पाणी देणे गरजेचे असते तर हे नुकसान टाळण्यासाठी आपण पुढील उपाय करू शकता या संदर्भातला हाच लेख आपण पाहणार आहोत.water pump problem

मोटार जळण्यासाठी वाचवण्याचे उपाय . water pump problem

1.प्लूजचा योग्य वापर :

प्लुज  वापरणे फार गरजेचे आहे . प्लूजमध्ये वितळतार वापरलेली असते. वितळता ही आपली फार मोठी मदत करते ज्यावेळी विद्युत पुरवठा जास्त होतो किंवा वाढतो अशावेळी सर्वात प्रथम वितळतार वितळते . वीज पुरवठा खंडित होतो आणि आपले मोटार जळण्यापासून सुद्धा वाचते .बराच वेळा अनेक जण अशे करतात वारंवार फ्युज उडत असल्यामुळे ते डायरेक्ट जाड तयार तयार वापरून प्लूज वापरतात. अशावेळी विद्युत दाब वाढला किंवा क्षमतेने जास्त झाला तर डायरेक्ट आपली मोटार यामुळे जळते.(water pump problem )

2.वायरिंग :-

आपल्याला स्टार्टर मध्ये बऱ्याच पॉईंटवर वायर करावी लागते. त्यामुळे वायरिंग करताना आपण स्क्रू चा वापर करतो स्क्रू  स्क्रूच्या साह्याने वायरिंग फिट करून त्या वायरिंग फिट बसवतो. पण बऱ्याच वेळा आपण काय करतोस फिट करताना वायरिंग करताना स्क्रू सेल ठेवतात त्यामुळे बऱ्याच वेळा वायरिंग व्यवस्थित फिट न केल्याने वीज आवश्यक सप्लाय हा अपूर्ण होऊन जातो आणि त्याचा सुद्धा मोठा जळण्यावर परिणाम होतो हे सुद्धा कारण त्यामागे आहे.

 

बांधकाम कामगार योजना कामगारांना मिळत आहे ही गृह उपयोगी वस्तु पहा कसा करावा अर्ज

3.ऑटो स्विच :-

स्टार्टर ला ऑटो स्विच कनेक्ट करणे खूप महत्त्वाचे ठरते . त्यामुळे जर एखाद्या वेळी सप्लाय जास्त व्होल्टेजचा आला किंवा सप्लाय कमी झाला तर स्विच ऑटोमॅटिक बंद पडते . त्यामुळे पुढील पुरवठा खंडित होऊन आपली मोटार जळण्यापासून वाचते . बरेच शेतकरी बांधव स्टार्टरला ऑटो स्विच वापरत नसल्यामुळे डायरेक्ट विद्युत पुरवठा स्टार्टरला जातो व यामुळे मोटार जळण्याचे प्रमाण वाढते . त्यामुळे ऑटो स्विच बसून घेणे खूप आवश्यक आहे जरी सप्लाय हा जास्त झाला किंवा कमी झाला तरी आपली नुकसान यामुळे वाचणार आहे.

4.योग्य स्टार्टर :-

मोटार सुरू करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे काम हे स्टार्टर करत असते. बऱ्याच कारणांमध्ये आपण आपली मोटार ज्या क्षमतेची आहे , त्या क्षमतेपेक्षा जास्त एचपी चा स्टार्टर बसवला जातो. त्यामुळे व्होल्टेज कमी जास्त झाला तरी मोटर चालू व्हायला याचा फायदा होतो परंतु जास्त क्षमतेचे स्टार्टर घेतले तर त्यामागे येणार आहे रिले सुद्धा हा जास्त क्षमतेचा असतो आणि हा सुद्धा आपल्या मोटार जळण्यासाठी (water pump problem )  कारणीभूत ठरतो . त्यामुळे आपली मोटार कमी एच पी असते व लाइट प्रवाह जास्त क्षमतेचा गेल्यास मोटार जळते . अशा वेळी स्टार्टर त्यास क्षमतेचा स्टार्टर घ्यावा जेणेकरून आपली मोटार जळणार नाही.water pump problem

पीएम किसान शेतकरी योजना नवीन नोंदणी

Leave a Comment