Voting List update 2024 मतदार यादी होणार अपडेट , 25 जून पासून सुरुवात

WhatsApp Group Join Now
Join Now

Voting List update 2024 मतदार यादी होणार अपडेट , 25 जून पासून सुरुवात

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो सध्या लोकसभा निवडणूक पार पडल्या आता येथे काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन देखील सज्ज झाले असून मतदार याद्या अद्यावत करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे.

साधारणपणे 25 जून पासून प्रशासनाने या कामासाठी सुरुवात केली असून अंतिम यादी 20 ऑगस्टला तयार होणार आहे व प्रसिद्ध केली जाणार आहे.

महिनाभरामध्ये मतदारांचे सर्वेक्षण नवीन मतदान नोंदणी करण्यासाठी केंद्रस्तरीय मतदान अधिकारी सज्ज झाले आहे. याच महिनाभराच्या कालावधीमध्ये नवीन मतदारांची नोंदणी तसेच दुबार मतदार वगळणे त्याचप्रमाणे पत्त्यामध्ये नावामध्ये दुरुस्ती असेल तर इत्यादी उपक्रम राबवले जाणार आहे.

राज्याच्या विधानसभेचा कालावधी हा 26 नोव्हेंबर रोजी संपत असून त्यासाठी केंद्रस्तरीय निवडणूक आयोगाने मतदार याद्या अपडेट करण्याचे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यांना दिलेले असून 25 जून ते 24 जुलै या महिन्यात घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करणार आहे.

यामध्ये जर आपल्या यादीमध्ये चुकांची दुरुस्ती करणे फोटो बदलणे त्याचप्रमाणे पत्त्यामध्ये दुरुस्ती करणे मंदार केंद्राची सीमा निश्चित करणे भाग याद्या अडचणी करणे नव्या मतदारसंघांचा निर्मिती करणे इत्यादी कामे केली जाणार आहे.

त्यामुळे नवीन मतदार नोंदणी व आपले मतदान करण्याचे काम या कालावधी आपण पूर्ण करावे. Voting List update 2024

Leave a Comment