update your Aadhaar २०२४ : आपले आधार कार्ड करा अपडेट , अन्यथा कार्ड होऊ शकते रद्द

WhatsApp Group Join Now

update your Aadhaar नमस्कार मित्रांनो ,आधार कार्ड हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे समजले जाणारे  कागदपत्र होय . अनेक महत्त्वाच्या कामासाठी आपल्याला आधार कार्ड (update your Aadhaar )  वापरावे लागते. सरकारी कार्यालयमध्ये त्याचप्रमाणे सिम कार्ड घेताना बँकेत आधारचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो.

आधार कार्ड आणि आता पॅन कार्ड हे लिंक करणे हे अत्यावश्यक केले होते त्याशिवाय आपल्याला इन्कम टॅक्स फाईल करताना सुद्धा अनेक अडचणी आलेले आहे. बरेच जण आपले आधार कार्ड वरील जुनी माहिती अपडेट केली नसेल तर आपले अनेक काम यामुळे अडकू शकतात.

सरकारी काम अडकले,काम होत नाही,त्रास देतंय?आता थेट करा ऑनलाइन तक्रार !

आधार कार्ड अपडेट न केल्यामुळे बसण्याचे प्रकार सुद्धा सध्या वाढत असल्याचे दिसून येत आहे . आता 14 मार्च पर्यंत आधार कार्ड कोणत्याही शुल्काशिवाय अपडेट करण्याची सुविधा दिली आहे 14 मार्च पर्यंत आपल्याला आपले आधार कार्ड हे निशुल्क अपडेट करता येणार आहे . त्यासाठी कोणतेही पैसे मोजावे लागणार नाही.

आधार कार्ड वर जर आपण नोकरी निमित्त बाहेरगावी असेल तर आपल्याला आपला पत्ता दुरुस्त करण्यासाठी अपडेट करता येईल किंवा आपण एखाद्या ठिकाणी स्थायिक झाला असेल तर तो पत्ता आपल्याला त्या ठिकाणी अपडेट करायला आवश्यक आहे.

आधार कार्ड अपडेट update your Aadhaar कसे करावे ?

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आपल्याला आधार कार्डच्या अधिकृत वेबसाईट ला जाऊन तिथे आपल्याला आपला आधार क्रमांक लॉगिन करून ओटीपी प्राप्त झाल्यानंतर , आपण त्यामध्ये बदल करू शकतो मात्र काही बदल करताना आपल्याला आवश्यक असे कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे . तरच आपले आधार कार्ड त्या ठिकाणी अपडेट होणार आहे . जर आपल्याला ऑनलाइन पद्धतीने आधार कार्ड अपडेट करता येत नसेल तर आपण जवळच्या सीएससी केंद्र किंवा आधार केंद्र मध्ये जाऊन आपले आधार कार्ड अपडेट करून घ्यावे.

Also Read  PIK Nuksan Bharpai Yojana 2024 ई-केवायसी साठी फक्त 4 दिवस शिल्लक , तर मिळेल शेतकऱ्यांना नुकसानभरपाई

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी अधिकृत वेबसाईट आणि अधिकृत आधार केंद्रावरच आपली माहिती अपडेट करा.

Leave a Comment