Drip irrigation – केंद्र शासनाने सूक्ष्म सिंचनाच्या अनुदानामध्ये मोठे बदल केलेले आहे. शेती करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे म्हणजे पाणी होय. शेतीला पाणी देण्यासाठी तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन या दोन योजना अत्यंत महत्त्वाच्या ठरतात यामुळे पिकांना पाणी देताना पाणी बचत सुद्धा होते आणि पिकांची वाढीला सुद्धा मदत होते.
केंद्र शासनाने सिंचन योजना केलेला मोठा बदल.
तुषार सिंचन संच ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांना सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेण्यासाठी सात वर्ष कालावधी होता. सात वर्षाचा कालावधी आता तीन वर्षा केलेला आहे यामुळे सूक्ष्म सिंचनाचा लाभ देण्यास केंद्र शासनाने याबाबत मान्यता दिलेली आहे.
तसेच हे अनुदान ऑटोमेशन अनुदान कक्षेमध्ये आणले आहे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून पंतप्रधान सूक्ष्म सिंचनासाठी प्रति थेंब अधिक पीक या उपक्रमासाठी अनुदान दिले जाते . या योजनेमुळे अनेक अडचणी गुंतागुंतीच्या होत्या त्या अडचणी दूर करून बदल करण्याचा प्रस्ताव याबाबत राज्य शासनाने केंद्राला पाठवला आहे . त्यानुसार 2023 मध्ये नव्या मार्गदर्शक सूचनानुसार यामध्ये बदल केले आहे . जुन्या नियमांमध्ये सूक्ष्म संचार चा लाभ घेण्यासाठी सात वर्ष वाट पहावी लागायची आता हा कालावधी फक्त तीन वर्षापर्यंत कमी करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना याचा कसा फायदा होणार
या योजनेचा लाभ घेताना एखाद्या शेतकऱ्यांनी तुषार संच योजनेचे अनुदान घेतले आहे अशा शेतकऱ्याला आता तीन वर्षानंतर ठिबक संच घेण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे.
दीपक अनुदानाची परिगणना करत असताना आधीच्या तुषार सिंचन योजनेसाठी दिलेल्या अनुदानाची रक्कम ते फक्त संच अनुदानातून वजा करून उरलेले रक्कम त्या शेतकऱ्याला दिले जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांना एका शेतामध्ये पीक पद्धतीमध्ये बदल करण्यासाठी पर्याय उपलब्ध आहे.
तुषार संच माध्यमातून पाण्याचा जास्त प्रमाणामध्ये वापर होतो तरी त्या मानाने ठिबक संच याच्या माध्यमातून पाण्याची बचत व योग्य खर्च दिले जातात जमिनीमध्ये हवा खेळती राहतात असे अनेक फायदे यामध्ये आहे.