नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो साधारणतः यावर्षी पाऊसमान हे साधारणतः समाधानकारक सांगितलेले आहे. सध्या शेतीवर आधारित विविध कामांची जोरदार तयारी सुरू झालेली आहे पावसापूर्वी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे जमिनीची मशागत आणि मशागत झाल्यानंतर पेरणी करणे हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं.
आज आपण टोकन यंत्र ज्याच्या माध्यमातून बी टोकन केले जाते किंवा पेरणी केली जाते अशा यंत्राविषयी माहिती पाहणार आहोत.
शेतकऱ्यांना शासनाकडून वेगवेगळे योजना या शासनाच्या महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून राबवले जातात आज आपण महाडीबीटी पोर्टलवर ना टोकन यंत्र साठी कसा ऑनलाईन अर्ज करायचे याची माहिती पाहणार आहोत.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी काय करावे?
सुरुवातीला आपल्याला शासनाच्या अधिकृत महाडीबीटी पोर्टल जावे लागणार आहे तिथे आपल्याला आपली प्रोफाईल तयार करावी लागेल म्हणजे प्रोफाईल तयार करणे म्हणजे आपली तिथे एक अकाउंट तयार करणे आणि त्यामध्ये सर्व माहिती परिपूर्णपणे भरणे आवश्यक आहे.
आपल्याला प्रोफाइल झाल्यानंतर लॉगिन करायचा आहे किंवा आपल्या आधार क्रमांकावरनं सुद्धा आपण या ठिकाणी लॉगिन करू शकतो.
आपल्याला यानंतर अर्ज करा या ठिकाणी क्लिक करावे लागणार आहे.
यानंतर आपल्याला कृषी यांत्रिकीकरण येथे जाऊन विविध बाबी निवडा या पर्यावरण क्लिक करायचे आहे. कृषी यांत्रिकीकरण साठी अर्ज करण्याच्या प्रोसेस मध्ये आपल्याला मुख्य घटक म्हणून कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडून आवश्यक माहिती भरून ती माहिती जतन करायची आहे. यामध्ये आपल्याला तपशील मध्ये मनुष्य चलीत अवजार आणि यंत्रसामग्री यामध्ये टोकन यंत्र हा पर्याय निवडायचा आहे. म्हणजे मशीन चा प्रकार टोकन यंत्र असा येईल यानंतर सहमती दर्शवायचे आहे म्हणजे टिक करायचे आहे आणि माहिती जतन करा हा पर्याय निवडायचा आहे अत्यंत सोपा आहे.
यानंतर आपल्याला आपला अर्ज सादर करायचा आहे जर आपण अनेक योजनांमध्ये जर सहभाग घेतला असेल तर आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचा आहे आणि प्राधान्यक्रम भरल्यानंतर मग आपल्याला अर्ज सादर करा हा पर्याय निवडायचा आहे.
यानंतर जर आपल्याला पहिल्यांदाच अर्ज करायचा असेल तर काही रक्कम आपल्याला त्या ठिकाणी भरावे लागणार आहे ती आपण भरायची आहे आणि त्याबद्दल आपल्याला पावती सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे.
याच्यानंतर आपल्याला आपला अर्ज यशस्वी पणे भरल्यानंतर लॉटरी पद्धतीने आपल्याला आपल्या यादी प्राप्त होईल व त्यानंतर आपली निवड केली जाणार आहे.