नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो दिवाळीमध्ये प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता. एस टी महामंडळ यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी दहा टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे एसटीच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार होती.
दरवर्षीप्रमाणे एसटी बस मध्ये गर्दीच्या हंगामामध्ये भाडेवाढ केली जाते. यावर्षी 25 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर या एका महिन्याच्या कालावधीसाठी दहा टक्के भाडेवाढ लागू करण्यात आली होती. मात्र प्रवाशांना दिलासा देत एसटी महामंडळाने ही १० टक्के भाडे वाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे एसटीच्या प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा लाभ होणार आहे.
एसटी प्रवासांना दिलासा
दिवाळी सणानिमित्त अनेक सर्वसामान्य नागरिक क्षणानिमित्त इतरत्र प्रवास करत असतात. दहा टक्के हंगामी भाडेवाढ रद्द केल्यामुळे प्रवासांना होणारा आर्थिक तोटा यामुळे नागरिकांना व एसटीच्या या निर्णयामुळे अनेक प्रवासांना याचा फायदा नक्कीच होणार आहे.
सध्या महामंडळाला दिवसाला सुमारे 23 ते 24 कोटी रुपयांचे प्रवासी उत्पन्न मिळत आहे . हंगामी भाडेवाढामुळे उत्पन्न ही पाच ते सहा कोटी रुपयांनी वाढण्याची शक्यता होती. त्यामुळे महिनाभरात महामंडळाला जवळपास एक हजार कोटी रुपयांचे महसूल मिळण्याची अपेक्षा होती. मात्र आत्ताचा घेतलेल्या निर्णयामुळे सध्या महिन्याला 850 कोटी रुपये महामंडळाला उत्पन्न मिळेल.