soyabean subsidy scheme in maharashtra शेतकऱ्यांसाठी बातमी या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये मिळणार

WhatsApp Group Join Now

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे . ती म्हणजे शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये मिळणार सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे.  तसेच शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या मदत करण्याचा  हा निर्णय  कृषी विभागाने तसेच राज्य सरकारने शासन निर्णय जारी केलेला आहे . त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीचा लाभ होईल यापुढे आपण सविस्तर माहिती बघूया.

गेल्या वर्षी राज्यात कमी प्रमाणावर पाऊस पडला ; त्यामुळे शेतकऱ्यांचे कापूस सोयाबीनचे उत्पन्न हे खूप कमी झाले आणि त्याचे दरही घसरले .  त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसल्यामुळे शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत म्हणून ही घोषणा केलेली आहे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण.

प्रती हेक्टरी 5000 मिळणार

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये ते दोन हेक्टर च्या मर्यादित प्रति हेक्टरी पाच हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे.  तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 1548 कोटी 34 लाख रुपये आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2646 कोटी 34 लाख इतका निधी त्यासाठी वितरित करण्यात आलेला आहे.

कोणते शेतकरी अनुदानास पात्र ठरणार

महाराष्ट्र ई पीक पाहणी पोर्टल द्वारे कापूस व सोयाबीन पिकाची नोंदणी केलेले सर्व शेतकरी अनुदानात पात्र ठरणार आहेत .  तसेच डीबीटी द्वारे ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिले जाणार आहे. हा निर्णय लाखो शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे तसेच सरकारने शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचे बातमी सादर केलेले आहे.

अशाप्रकारे सरकारने शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी घेऊन आलेले आहेत याचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा . 

Also Read   नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच नागरिकांना दिलासा – व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात LPG Price in Maharashtra

Leave a Comment