नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो शेतीमध्ये उत्पादन घेत असताना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते . राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे मुसळधार पाऊस दुष्काळ यामुळे शेतीचे मोठे नुकसान होते नुकसान भरपाई बाबत राज्य शासनाने मोठी घोषणा केली असून खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे.
सोयाबीन उत्पादक शेतकरी आणि कापूस उत्पादक शेतकरी यांना मागील वर्षी खरीप हंगामामध्ये नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे .याबाबतचा शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध झाला आहे.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई साठी काय करावे लागेल?
सोयाबीन उत्पादन शेतकरी आणि कापूस उत्पादक शेतकरी यांना नुकसान भरपाई करण्यासाठी आपल्या सातबारा उतारा पिक पेरा नोंद केलेले शेतकरी या अर्थसहाय्यासाठी पात्र असणार आहे.
नुकसान भरपाई साठी कोणती कागदपत्र आवश्यक आहे?
ज्या शेतकरी बंधूंनी ही पीक पेरायची नोंद केलेली आहे किंवा सातबारावर त्यांची नोंद आहे. अशा सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी ते पात्र आहे . या पात्र शेतकऱ्यांनी आधार क्रमांक व बँक खाते सलग्न असलेले आवश्यक आहे तसेच या शेतकऱ्यांनी वैयक्तिक सहमती पत्र किंवा सामूहिक शेती असल्यास सामूहिक ना हरकत प्रमाणपत्र सादर करणे. सुद्धा अत्यंत आवश्यक आहे यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली जाणार आहे.
कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना किती मदत मिळणार व मर्यादा किती आहे?
2023 च्या खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून राज्य शासनाने पाच हजार रुपये प्रति हेक्टर म्हणजे दोन हेक्टर पर्यंत मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
कोणते शेतकरी पात्र ठरणार?
सोयाबीन कापूस उत्पादक असलेल्या व ज्यांनी ईपीक पेऱ्याची नोंद केलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे. या पात्र लाभार्थ्यांचे सुद्धा आधार व बँक खाते हे एकमेकांना संलग्न असणे आवश्यक.
नुकसान भरपाई साठी किती प्रस्तावित केला आहे?
2023 च्या खरीप हंगामात झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई बाबत राज्य शासनाने जो निर्णय घेतला आहे त्यामध्ये दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन असणाऱ्या प्रत्येक दहा हजार रुपये तर त्याहून कमी असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येक पाच हजार रुपये प्रमाणे अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे.
नुकसानभरपाई समंती पत्रक डाउनलोड करा .
सोयाबीन नुकसान भरपाई करता 2646 कोटी तर कापूस पिकाच्या नुकसान भरपाई साठी 1548 कोटी रुपये असे एकूण 4194 कोटी रुपयांच्या निधी देण्यास मान्यता घेण्यात आलेली आहे.
ई पीक पाहणी करणे अत्यंत महत्त्वाचे?
तर शेतकरी मित्रांनो सध्या एक ऑगस्ट 2024 पासून ई पाहणी सुरू असून लवकरात लवकर आपल्या शेतामध्ये उभे असलेल्या पिकाची ई पिक पाहणी नक्की करा जेणेकरून भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणी त्या दूर होतील.