7/12 सात बारा उतारा जमिनीबाबत सर्वात महत्त्वाचा कागद असतो. जमिनीच्या व्यवहारामध्ये सात बारा उतारा नोंद झाली की ती अंतिम नोंद असते. बऱ्याच वेळा सात बारा उतारावरील काही बाबी आपल्या लक्षात येतात तर काही बाकी माहिती नसते.विविध जमिनीच्या कामामध्ये किंवा योजना लाभ घेताना घ्या बाबी नंतर लक्षात येतात आणि त्यावेळी त्या दुरुस्ती करणे शक्य होत नाही.आजच्या लेखामध्ये शेतजमिनीच्या सात बारा उतारावर नेमक्या कोणत्या नोंदी असतात याविषयी माहिती पाहणार आहोत. हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
नेमका 7/12 म्हणजे काय?
सात बारा उतारा समजून घेताना सर्वात प्रथम सात बारा उतारा म्हणजे काय हे पहिलें समजून घेणे आवश्यक आहे. सात बारा उतारा हा दोन प्रकारच्या नोंदी दर्शवित असतो .यातील एक नोंद गाव नमुना 7 आणि एक गाव नमुना 12 दाखवत असते. गाव नमुना 7 ही शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे याची नोंदवलेली माहिती असते तर नमुना 12 यामध्ये त्याने कोणती पिके घेतली आहे याची नोंद घेतलेली असते.वरील दोन्ही नोंदी एकाच कागदावर एकत्र असल्यामुळे त्याला सातबारा उतारा असे म्हणतात.
१. गाव व ताळ्याचा तपशील (गाव आणि जमिनीचा नंबर):
जसं आपल्या घराचा एक पत्ता असतो, तसं प्रत्येक जमिनीचाही एक पत्ता असतो.या पत्त्यात गावाचं नाव, गट क्रमांक (Survey Number) आणि त्याचा उपविभाग (उदा. A/1, B/2) दिलेला असतो.हा क्रमांक बघून कुठली जमीन कोणत्या ठिकाणी आहे, हे ओळखता येतं.
२. मालकाचं नाव आणि हिस्सा (कोणाची जमीन आणि किती):
ही नोंद सांगते की जमीन कोणाच्या नावावर आहे.एकापेक्षा जास्त लोकांची जमीन असेल तर कोणाचा किती भाग आहे तेही इथे लिहिलेलं असतं.
३. जमिनीचा प्रकार (जमीन कशासाठी वापरली जाते):
या भागात लिहिलेलं असतं की जमीन कशासाठी वापरली जाते.काही जमीन पावसाच्या पाण्यावर शेतीसाठी असते – तिला म्हणतात जिरायती.काही जमीन विहीर, बोरवेलने पाणी देऊन शेती करते – ती असते बागायती.काही जमीन काही कारणाने शेतीसाठी वापरली जात नाही – तिला म्हणतात पडिक.
४. पीक नोंद (जमिनीत कोणतं पीक घेतलं):
शेतकरी आपल्या जमिनीत कोणतं धान्य, भाजीपाला, उस इ. घेतो, त्याची नोंद इथे असते.हे पिकं कोणत्या हंगामात घेतलं (पावसाळा, हिवाळा, उन्हाळा), तेही दिलं जातं.
५. कर्ज व जप्तीची नोंद (बँकेचं कर्ज आणि अडचणी)
शेतकऱ्याने जमिनीवर कर्ज घेतलं असेल, तर बँकेचं नाव आणि किती कर्ज घेतलं ते इथे लिहिलेलं असतं.जर शेतकऱ्याने कर्ज वेळेवर भरलं नाही, तर बँक जमीन जप्त करू शकते – यालाच म्हणतात जप्तीची नोंद.