नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो शासन शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवत असते. पी एम किसान या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीमध्ये भांडवलासाठी व विकासासाठी वर्षाला 6000 रुपये प्राप्त होतात. आता शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या वतीने 3000 रुपये पेन्शन मिळणार आहे. आज आपण याविषयी माहिती पाहणार आहोत. pradhan mantri mandhan yojana
पी. एम. किसान मानधन योजना म्हणजे काय? pradhan mantri mandhan yojana
पी एम किसान मानधन योजना या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 60 वर्षा नंतर शेतकऱ्यांना तीन हजार रुपये पेन्शन स्वरूपामध्ये मिळणार आहेत. शेतकऱ्यांसाठी ही योजना पूर्णतः ऐच्छिक स्वरूपामध्ये आहे.
शासनाने ही योजना प्रामुख्याने 9 ऑगस्ट 2019 पासून प्रभावीपणे राबवण्यास सुरुवात केलेली आहे. शेतकऱ्यांना साठ वर्षानंतर त्यांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन देणे विषयी योजना आहे. pradhan mantri mandhan yojana
पी एम किसान मानधन योजना ही आहेत महत्त्वाच्या गोष्टी.
पी एम किसान मानधन योजनेमध्ये शेतकऱ्यांना म्हणजे ज्यांचे वय 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान आहे . अशा शेतकऱ्यांना 60 वर्ष पूर्ण केल्यानंतर पेन्शन प्राप्त होते. मात्र या वयोगटातील शेतकऱ्यांना त्यांच्या वयोमानानुसार काही रुपये हप्ता भरावे लागणार आहे. 55 ते 200 रुपयांच्या प्रीमियम भरावा लागणार आहे आणि त्यानंतर या योजनेमध्ये शेतकऱ्यांना साठ वर्षानंतर पेन्शन प्राप्त होणार आहे.
पी एम किसान मानधन योजना पात्रता. pradhan mantri mandhan yojana
- या योजनेमध्ये अर्ज करण्यापूर्वी शेतकऱ्यांचे वय हे 18 ते 40 असणे आवश्यक आहे.
- अर्ज करणारे शेतकऱ्याकडे दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन असणे आवश्यक आहे.
- देशभरातील सर्व भूधारक शेतकरी याच्यामध्ये समाविष्ट होतात.
पी एम किसान मानधन योजना कागदपत्र. pradhan mantri mandhan yojana
- आधार कार्ड
- जमिनीचा सातबारा आठ अ उतारा
- जन्मतारीख पुरावा
- बँक पासबुक
पी एम किसान मानधन योजना प्रीमियम किती बसणार? pradhan mantri mandhan yojana
ही योजना साधारणपणे 18 ते 40 या वयोगटातील आहे त्यामुळे कमीत कमी प्रीमियम 55 रुपये व जास्तीत जास्त पूर्वी प्रीमियम 200 रुपये तो आपल्या वयोगटावर आधारित आहे.
या योजनेमध्ये तुम्ही जेवढा प्रीमियम देणार आहे तेवढे शासन प्रीमियम भरणार आहे दोघांची मिळून पैसे जमा होणार आहे आणि नंतर साठ वर्षानंतर आपल्याला याचा लाभ मिळणार.
अर्ज कुठे करावा
या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला सी.एस.सी केंद्रामध्ये जाऊन अर्ज करावा लागणार आहे.