pradhan mantri bima suraksha yojana फक्त वीस रुपयात काढा दोन लाखाचा विमा तुम्ही काढलाय का?
नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो सध्याचे जीवन हे धकाधकीचा आणि धावपळीचे युग आहे यामध्ये सतत काही ना काही घडत असतं यासाठी आपली सुरक्षा म्हणून विमा कवच असलेलं कधी पण उत्तम असते. तर आज या लेखाच्या माध्यमातून आपण वीस रुपयांमध्ये दोन लाखाचा विमा कसा काढायचा याविषयी माहिती पाहणार आहोत.
केंद्र शासनाच्या वतीने 2015 पासून पंतप्रधान सुरक्षा विमा योजना नागरिकांसाठी राबविण्यात येते. या योजनेमध्ये वीस रुपयात 2 लाखाचा विमा दिला जातो.
विमा योजनेची वैशिष्ट्ये वैशिष्ट्ये. pradhan mantri bima suraksha yojana
वीस रुपयांमध्ये दोन लाखाचा विमा उतरवला जातो.
विमाधारक व्यक्तीचा मृत्यू तसेच अपघाती अपंगत्व त्याला संरक्षण दिले जाते.
आपले जर विविध बँकेमध्ये बचत खाते असतील तर अशा व्यक्तीला कुठल्याही एका बचत खात्याद्वारे या योजनेचा लाभ घेऊ शकता.
ही योजना फक्त एका वर्षासाठी असल्यामुळे आपल्याला दरवर्षी नूतनीकरण करून घ्यावे लागते म्हणजे दरवर्षी आपल्याला 20 रुपये भरणे आवश्यक आहे.
नैसर्गिक आपत्ती केव्हा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये रक्कम त्याच्या वारसाला दिली जाते.
अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे विमाधारकाच्या डोळ्यांची संपूर्ण आणि कधीही बरी न होणारी हानी म्हणजे कायमस्वरूपी आणि झाल्यास किंवा दोन्ही हात निकामी झाल्यास किंवा दोन्ही पाय निकामी झाल्यास किंवा एक डोळा, एक हात, एक पाय कायमस्वरूपी निकामी झाल्यास दोन लाख रुपये दिले जातात.
एका डोळ्याची बरी न होणारे हानी झाल्यास किंवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास एक लाख रुपये दिले जातात.
प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना आधिक माहितीसाठी इथे क्लिक करा
देशभरातील 16 ते 70 वर्ष वयोगटातील सर्व बचत खाते बँक धारक योजनेचा लाभ घेऊ शकता किंवा पोस्ट खाते किंवा सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीच्या मदतीने आपण याचा लाभ घेऊ शकतात किंवा बँकेमध्ये बचत खाते याच्या माध्यमातून सुद्धा आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता.
हा विमा कुठे काढावा
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण आपल्या बँकेचे संपर्क साधावे व त्याप्रमाणे आपला अर्ज त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे.
विमा काढण्यासाठी कोणती कागदपत्र द्यावी
तर अर्जदारांनी आधार कार्ड , ओळखपत्र , जन्माचा दाखला , उत्पन्नाचा दाखला , मोबाईल क्रमांक , पासपोर्ट आकाराचा फोटो जोडून द्यायचा आहे .
ऑनलाइन ऑटो डेबिट पद्धतीने खात्यातून दरवर्षी वीस रुपयांचा हप्ता हा कपात केला जाणार जातो.