Pm kisan yojana amount नमस्कार शेतकरी बंधू 28 फेब्रुवारी रोजी यवतमाळ येथील कार्यक्रमांमध्ये पीएम किसान सन्माननीय योजना आणि महाराष्ट्र राज्य नमो शेतकरी सन्माननीय योजना याची सर्वांचे मिळून शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये जमा करण्यात आले आहे . पी एम किसान योजनेसाठी सुमारे नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 21000 कोटी रुपये जमा करण्यात आले आहे ही सर्व रक्कम डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून जमा करण्यात आली आहे. आज आपण या संदर्भात माहिती पाहणार आहोत.
६००० रुपये जमा झाले कसे काय कळेल? Pm kisan yojana amount
जर आपले बँक खाते आपल्या मोबाईल नंबरची कनेक्टेड असेल तर आपल्याला डायरेक्ट त्या संदर्भामध्ये खालील प्रमाणे sms आलेला असेल.

अशाप्रकारे आपल्याला दोन हजार रुपयांचा एक मेसेज आणि नमो शेतकरी योजनेचा 4 हजार रुपयांचा मेसेज जर प्राप्त झाला असेल तर आपल्या खात्यावर सहा हजार रुपये जमा झाले असे समजावे.
राज्यातील सर्व योजना येत्या सहा महिन्यात ऑनलाईन होणार
जर आपल्याला एसएमएस प्राप्त आला नसेल तर आपण आपल्या बँक खात्याचे स्टेटमेंट अथवा पासबुक वर या प्रकारच्या नोंदी घेऊन जमा झाल्याची खात्री करून घेऊ शकता.
नमो शेतकरी सन्माननीय योजनेसाठी आपल्याला आपल्या पासबुक वर NSMNY अशी नोंद पहावयास मिळेल व पी एम किसान योजनेसाठी PM KISAN अशी नोंद पहावयास मिळेल.