PM Kisan Nidhi Yojana 17th installment नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींना नुकताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये NDA सरकार राज्यामध्ये निवडून आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आपल्या पदाचा पदभार स्वीकारताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला असून पी एम किसान योजनेच्या निधीवर फाईलवर स्वाक्षरी करून पहिला निर्णय घेतला.
यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना सतरावा हप्ता जारी करण्यात आला असून यामध्ये जवळपास नऊ कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार असून त्यासाठी वीस हजार कोटी निधी खर्च करण्यात येणार आहे.
त्यामुळे लवकरच आता पीएम किसन योजनेचा सतरावा हप्ता डीबीटीचे माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे.
पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार प्राप्त होतात यामध्ये चार महिन्याला 2000 वितरित केले जातात त्याचा सतरावा हप्ता नुकताच आता जून महिन्यात वितरित होण्याची शक्यता आहे.