नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. हे सहा हजार रुपये देत असताना चार महिन्याच्या अंतराने दोन दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात.
पी एम किसान योजनेचा अठरावा आता कधी मिळणार? pm kisan 18th installment date
पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता हा पाच ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्रातील वाशिम येथून शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केला जाणार आहे.
पी एम किसान निधी योजनेचा आतापर्यंत 17 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेले आहे. केवायसी कशी करणार
ई केवायसी म्हणजे काय?
पी एम किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी यापूर्वी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असेल. जर आपण केवासी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच आपल्याला अठरावा हप्ता हा प्राप्त होणार आहे.
शेतकऱ्यांना ही केवायसी सोबत आधार बँक खाते लिंक करावे लागणार आहे. त्यानंतर जमीन पडताळणी प्रक्रिया सुद्धा पूर्ण करावे लागणार आहे. या तीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच आपल्याला अठरावा हप्ता आपल्या खात्यावर वर्ग होणार आहे.