ब्रेकिंग न्यूज ! नमो महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

WhatsApp Group Join Now
Namo kisan mahasanman nidhi yojana

नमस्कार शेतकरी बंधूंनो , दिनांक 26 ऑक्टोबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी माध्यमातून जमा करण्यात आला आहे. या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातून सुमारे 1 कोटी 20 लाख शेतकऱ्यांनी या योजनेसाठी आपला अर्ज सादर केला होता.

अर्ज केलेले एवढे शेतकरी झाले पात्र

नमो शेतकरी महा सन्मान योजनेमध्ये जवळजवळ एक कोटी वीस लाख शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये आपला अर्ज दाखल केला होता. मात्र यातील फक्त 95 लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आले आहे. त्यापैकी 87 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 26 ऑक्टोबर रोजी प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे हप्ता जमा करण्यात आला आहे.

केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेच्या प्रमाणे महाराष्ट्र राज्याने नमो किसान महासन्मान निधी योजना सुरू करण्याची घोषणा केली होती व त्याप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना अर्ज करण्यास सांगितले होते त्यानुसार शेतकऱ्यांनी अर्ज केले व त्या संदर्भातील पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला.

आपल्या गावातील मतदार यादीत आपले नाव आहे का चेक करण्यासाठी क्लिक करा

पात्र शेतकऱ्यांनी जरा हप्ता जमा झाला नसेल तर पुढील कारवाई करावी

या योजनेमध्ये जवळपास आठ लाख शेतकरी यांच्या खात्यावर या संदर्भात हप्ता जमा झाला नाही तर त्यांनी सर्वात प्रथम या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी ई – केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे या योजनेसाठी लागणारे सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात येणार आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्ता देण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिमोटच्या बटन दाबून या योजनेची रक्कम वितरित केली असली तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम येण्यासाठी काही कालावधी लागू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी येत्या दोन तीन दिवसांमध्ये आपल्या खात्यावर पैसे येण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. साधारणतः सोमवार पर्यंत ही रक्कम जमा होणे अपेक्षित आहे.

Also Read  Marriage Certificate Maharashtra Online लग्नाचा दाखला बनवण्यासाठी पण ती कागदपत्र लागतात जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रक्रिया

Leave a Comment