नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो शासन नागरिकांच्या कल्याणासाठी विविध योजना आखत असते . नुकताच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सर्वत्र अर्ज भरण्यासाठी गर्दी होत आहे . राज्य शासनाकडून मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवली जात आहे या योजनेविषयी आपण माहिती पाहूया.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये इतके अर्थसहाय्य दिले जाते . या योजनेमध्ये 31 डिसेंबर 2023 रोजी वयाची 65 वर्ष पूर्ण केलेल्या जेष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे . समाज कल्याण विभाग या योजनेची माहिती तळागाळापर्यंत पोहोचावे यासाठी प्रयत्नशील आहे.
ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याविषयी शासनाच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.
काय आहे नेमकी योजना?
ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या रोजच्या जीवनामध्ये जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानानुसार येणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी त्याचप्रमाणे त्यांना आवश्यक साधने उपकरणे खरेदी करण्यासाठी तीन हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे.
यासाठी शारीरिक असमानताता दुर्बलतेनुसार त्यांना सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करता येणारे मग यामध्ये ते चष्मा , श्रवण यंत्र , टायपॉड, स्ट्रिक व्हीलचेअर कमोड खुर्ची कंबर इत्यादी साहित्य राज्य शासनाच्या नोंदणीकृत योग उपचार केंद्र मनस्वास्थ्य केंद्र मनशक्ती केंद्र प्रशिक्षण केंद्र येथून त्यांना घेता येणार आहे.