नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची सध्या सर्वत्र काटेकोर आनंद बजावणी सुरू आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने या योजनेमध्ये लाडक्या बहिणी आपला अर्ज सादर करू शकतात. लाभार्थी नोंदणी पोर्टल समिती आणि लाभदायी प्रणाली समिती सध्या स्थापन करण्यात आलेले आहे. लाभार्थी नोंदणी फोर्ट समिती ऊर्जा विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्य समिती ही तयार करण्यात आले आहे. ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी नोंदणी आणि लाभ मिळवण्यासाठी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्ष खाली समिती गठीत करून त्यांवर जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे.
येत्या रक्षाबंधनला तीन हजार खात्यात जमा होणार
राज्य शासनाकडून मुख्यमंत्री लाडके बहिणी योजनेमध्ये दरमहा दीड हजार रुपये जमा करण्याविषयी ही योजना राबवण्यात येत आहे . या योजनेचा पहिला हप्ता हा कधी जमा होणार हा प्रश्न सर्वत्र विचारला जाणार होता. मात्र रक्षाबंधनच्या दिवशी राज्य सरकारकडून दोन महिन्याचे रक्कम 3000 रुपये ही जमा केली जाणार आहे. साधारणपणे जुलै महिन्यापासूनच ही योजना सुरू झाली असून जुलै महिन्यापासूनच दीड हजार रुपये जमा केले जाणार आहे. यापूर्वी नमूद करण्यात आले आहे सुरुवातीला अर्ज करताना महिलांना अनेक समस्यांचे सामना करावा लागत होता. मात्र आता या योजनेमध्ये अनेक सुटसुटीत बदल करण्यात आलेला आहे त्यामुळे महिलांना त्यांचे अर्ज करताना कोणाचीही अडचण येणार नाही.