MP LAND RECORD – ही 7 कागदपत्रांच्या आधारे जमीन स्वतःच्या मालकीची असल्याचे सिद्ध करता येणार.

WhatsApp Group Join Now
Join Now

Land Ownership Record – नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखाच्या माध्यमातून जमीन आपल्या नावावर सिद्ध करण्यासाठी कोणकोणती कागदपत्र आवश्यक आहे ; ते अत्यंत गरजेचे आहे याची माहिती पाहणार आहोत. सध्या जमिनीचे भाव हे दिवसेंदिवस हे वाढतच जाणार आहेत त्यामध्ये घट होणारच नाही ; वर्तमानपत्रात किंवा आपल्या आजूबाजूला आपण पाहतो की जमिनीबाबत वाद विवाद केसेस खटले न्यायालयामध्ये सुरू असतात .हे खटले तारीख पे तारीख अशा पद्धतीने पुढे पुढे सरकत राहते . खूप कालावधी यासाठी जातो वाद निर्माण झाल्यास संबंधित जमिनी आपल्या नावावर आहे हे सिद्ध करण्यासाठी जमिनीबाबत कायमस्वरूपी काही पुरावे जतन करणे फार गरजेचे असते. हे पुरावेच आपल्याला नंतर सिद्ध करण्यासाठी वापरावे लागतात.

जमिनीची मालकी हक्क संदर्भामध्ये जर भांडण निर्माण झाली तर जमिनीची मोजणी केली जाते .यावेळी जमिनीची मोजणी करताना नकाशे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते त्या जमिनीवरील मालकी हक्क प्रस्थापित करता येऊ शकतो .त्यामुळे जमीन मोजणीचे नकाशे जपून ठेवणे फार गरजेचे असते हल्ली तर आता ऑनलाईन पद्धतीने नकाशे उपलब्ध होत असतात. त्याचप्रमाणे जमीन आपल्या नावावर आहे की नाही हे सांगणार कागदपत्र म्हणजे सातबारा होय सातबारा वर त्या व्यक्तीच्या मालकीची शेतजमीन किती आहे याची माहिती दिली जाते . त्याचप्रमाणे ही जमीन शेतीची आहे की बिगर शेतीची ही माहिती प्रॉपर्टी कार्ड वरनं दिलेली असते

जमिनीसाठी आवश्यक असणारे पुढील कागदपत्रे जपून ठेवणे गरजेचे असते. )

1) खरेदी खत ( land purchase record )MP LAND RECORD

आपण जेव्हा एखादी जमीन विकत घेतो त्यावेळी खरेदी विक्रीच्या व्यवहारातील जमिनीची मूळ मालकी सिद्ध करण्यासाठी खरेदीखत आवश्यक असते. तो कागद म्हणजे आपण जमीन खरेदी केल्याची एक महत्त्वाचा पुरावा मानला जातो. खरेदी खतामध्ये ती जमीन बाबत सर्व इतिहास त्यामध्ये नमूद केलेला असतो .हा व्यवहार दोन व्यक्तींमध्ये झालेला असतो तो किती क्षेत्रासाठी म्हणजे जमीन किती दिली व कोणत्या भावाने दिले याची माहिती दिलेली असते. त्याचप्रमाणे सातबारा उतारावर नवीन मालकांची नोंद याच्या साह्याने केली जाते. यामध्ये चारही बाजूंच्या सीमांचा विचार करून हे खत तयार केलेले असते यामध्ये साक्षीदार असतात त्याचप्रमाणे याची नोंद शासकीय लघु निबंधक कार्यालय यांच्यासमोर केलेली असते व त्यानुसार आपण त्या संदर्भातले स्टॅम्प ड्युटी सुद्धा भरतो तो सुद्धा जपून ठेवणे आवश्यक आहे. नवीन खरेदी विक्री करत असताना आपण आत्ताची खरेदी विक्री चालु खरेदी खत करतो मात्र यामागील खरेदी खत संबंधित मालकाकडून आपण घेतले पाहिजे कारण तो सुद्धा आपल्याला पुढे उपयोगी पडत असतो त्यामुळे यापुढे लक्षात ठेवा नवीन जमीन खरेदी विक्री करताना तुमच्या व्यवहार जर यशस्वीपणे पार पडला तर जुने खरेदी खत घ्यायला विसरू नका.वडिलोपार्जित जमिनी बाबत सुद्धा जे जुने रेकॉर्ड असतील ते सुद्धा आपल्याला सांभाळून ठेवावे लागेल . जुने रेकॉर्ड जशी उपलब्ध होईल तसे ते जतन करणे आवश्यक होत चालले आहे . कारण हल्ली अनेक कारणावरून हे जुने रेकॉर्ड उपलब्ध होत नाही आणि मग पुढील पिढीला सुद्धा त्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळे आत्ताच ते रेकॉर्ड आपल्या कडे व्यवस्थित ठेवावेसातबारा

2) 7/12 उतारा ( sat baara uttara )

शेत जमिनीचा सातबारा उतारा हा जमिनीच्या मालकीच्या हक्कातील सर्वात महत्त्वाचा उतारा मानला जातो. गाव नमुना सात मध्ये शेतकऱ्यांच्या नावावर किती जमीन आहे . त्या शेतकऱ्याच्या कधी जमिनीवर मालकी आहे हे सर्व नमूद केलेलं असतं सातबारा उतारावर भूधारणा पद्धत नमूद केले असते .त्याचप्रमाणे जमिनीचा खरा मालक कोण याची ओळख पटण्यास मदत होते भोगवटदार वर्ग एक या पद्धतीने अशा जमिनी येत असतात. ज्याचं हस्तांतरण करण्यावर शासनाने निर्बंध लावलेले नसतात शेतकरीच हा या जमिनीचा मूळ मालक असतो . भोगवटदार वर्ग 2 मधील जमिनीवर हस्तांतर करण्यावर शासनाने निर्बंध लावलेले असतात.MP LAND RECORD

फक्त चार टक्के दराने मिळेल 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज ; अर्ज कसा करावा.

सरकारी अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय या जमिनीचे हस्तांतरण करण्यात येत नाही आणि तिसरा प्रकार म्हणजे ही जमीन सरकारच्या प्रवर्गात मोडत असते .या जमिनीवर मालकी ही सरकारची असते त्यानंतर चौथ्या प्रकारामध्ये सरकारी पट्टेदार जमिनी घेत असतात. या जमिनी भाडे तत्त्वावर दिलेल्या जमिनी असतात या जमाने साधारणतः 10 , 30 , 50 किंवा 99 वर्षाच्या मुदतीसाठी भाडेतत्त्वावर दिले जातात. तर काही जमीन ह्या मंदिरांच्या नावावर किंवा एखाद्या समाजाची असतात ती सर्व नोंद आपल्याला सातबारा उतारावर झालेल्या असते . सातबारा उतारा आपल्याला जमिनीबाबत सर्व माहिती देत असतो जमिनी सातबारावर मूळ मालकाच्या वारसांची नोंद सुद्धा असते

  3) 8 अ ( 8 A )MP LAND RECORD

एखाद्या शेतकऱ्याची जमीन अनेक गट क्रमांकामध्ये विभागलेले असू शकते. या सगळ्या गट क्रमांक मध्ये शेत जमिनीची माहिती ही एकत्रितपणे आठ म्हणजे खाते उतारावर नोंदवलेली असते. 8A उतारामुळेउ एखाद्या गावात आपल्या मालकीची जमीन कोण कोणत्या गटात आहे याची माहिती आपल्याला कळत असते .जमिनीच्या मालकी हक्कासाठी आठ अ चा उतारा महत्त्वाचा दस्तावेज मानला जातो.महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने आता डिजिटल स्वाक्षरी असलेले म्हणजेच व्हेरिफाईड व सातबारा उपलब्ध करून दिलेले आहे.Land ownership record

4) जमीन मोजणीचे नकाशे ( land Map )

जमीन मालकी हक्कांमध्ये काही वाद निर्माण झाल्यास जमिनीची मोजली केली जाते. यावेळी जमीन मोजणीचे नकाशे आपल्याजवळ असल्यास आपल्याला जमिनीवरील मालकी हक्क प्रास्तावित करता येऊ शकतो. त्यामुळे जमीन मोजणीचे नकाशे हे जपून ठेवणे सुद्धा अत्यंत गरजेचे आहे .एका ठराविक गट नकाशातील शेतजमीन कुणाच्या नावावर आहे .त्या शेतकऱ्याचे नाव आणि त्याच्या कडे नावावर किती जमीन आहे याची सविस्तर माहिती नकाशावर दिलेल्या असते .त्याचप्रमाणे सदर नकाशा मध्ये शेताच्या बाजूला असलेल्या शेत जमिनीचे गट क्रमांक सुद्धा या नकाशामध्ये दिलेल्या असतात म्हणजे शेजारी कोणत्या शेतकऱ्याचे शेती आहे हे सुद्धा यावरून समजत असते . त्याचप्रमाणे याच्यामध्ये ठराविक खानाखुणा सुद्धा दिलेल्या असतात.

5) महसुलाच्या पावत्या

महसुलाच्या पावत्या जमीन महसूल बाबत आपण दरवर्षी जमिनीचा महसूल भरल्यानंतर त्याला तलाठीमार्फत आपल्याला दिली जाणारी ही पावती होय . हा सुद्धा जमिनीबाबत महत्त्वाचा पुरावा करू शकतो . या पावत्या आपल्याला प्राप्त झाल्यानंतर त्या एका फाईल मध्ये जतन करून ठेवावी . जेणेकरून जर आपल्याला वेळ पडल्यास ही पावती उपयोगी येऊ शकते .

6) जमिनी संबंधी खटले

जमिनीसंबंधी चे आधीचे खटलेएखादी जमीन तुमच्या मालकीच्या असेल आणि या जमिनी बाबत यापूर्वी काही कोर्टामध्ये किंवा न्यायालयामध्ये खटला चालला असेल. तर अशा प्रकारच्या जमिनी बाबत केसची कागदपत्र त्यातील जबाब प्रत आणि निकाल प्रत इत्यादी महत्त्वाचे कागदपत्र आपण जपून ठेवले पाहिजेत. याचा वापर जर आपल्याला भविष्यामध्ये काही वाद निर्माण झाल्यास आपल्या जमिनीच्या मालकी हक्काचा दावा करण्यासाठी येऊ शकतो.

7) प्रॉपर्टी कार्ड ( property Card )

बिगर शेती म्हणजेच Non Agriculture Land जमिनीवर जर तुमची मालमत्ता असेल तर त्याच्या मालकी हक्काविषयी आपल्याला अत्यंत जागृत राहणं आवश्यक आहे .Non Agriculture Land जमिनीबाबत प्रॉपर्टी कार्ड होय. ज्या पद्धतीने सातबारा उतारा वर एखाद्या व्यक्तीच्या मालकी हक्काच्या नोंद केलेल्या स्टेटस प्रमाणे प्रॉपर्टी कार्ड वर सुद्धा सदर माहिती दिलेल्या असते.Mp land याचप्रमाणे जमिनी बाबत अनेक दस्तावेज असतात. पण यातील हे दस्तऐवज आपल्याकडे असणे आवश्यक आहे. कारण या संदर्भात आता अडचणी खूप वाढ चाललेले आहे.

 

Leave a Comment