नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य शासनाने राबवली आहे. या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर महिन्याला दीड हजार रुपये प्रमाणे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. माझी लाडकी बहीण योजना यामध्ये फक्त सरकारी योजनेचा लाभ घेताना फक्त एकच लाभ घ्यायचा आहे. mazi ladki bahin yojana duheri labharthi
माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यातून कोणत्याही प्रकारची रक्कम कट करू नये असे राज्य सरकारने बजाऊ नये बँकांनी पैसे कापल्याचे यापूर्वी समोर आले आहे. आता राज्य शासनाने याबाबत रिझर्व बॅंकेकडे याबाबत धाव घेतलेली आहे. जेणेकरून लाभार्थ्यांच्या खात्यातून कोणतेही प्रकारचे पैसे कट करू नये असे म्हटले आहे.
सरकारी योजनेचा दुहेरी लाभ घेतलेले
अनेक लाभार्थ्यांनी संजय गांधी निराधार योजना , अपात्र असतानाही अर्ज भरून पैसे घेतलेले त्याचप्रमाणे सरकारी योजनांचे दुहेरी लाभ घेतलेल्या लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थी यांच्याकडून पैसे वसूल करण्याचा सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे.
बँकांकडून पैसे कट केले जात आहे
महिला व बाल विकास विभागाचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये जुलै व ऑगस्ट या दोन महिन्याचे एकूण तीन हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटी च्या माध्यमातून वर्ग करण्यात आलेले आहेत. लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग झालेले रक्कम मात्र लाभार्थ्यांना काढता येत नाही ती रक्कम कर्जाच्या थकीत हप्त्यामध्ये जमा झालेली असून तिकडं वळवली आहे .असे प्रकार पाहायला मिळत आहे याबाबतच्या अनेक तक्रारी महिला मंडळींनी मांडलेले आहेत त्यामुळे या योजनेचा प्रत्यक्ष असा लाभार्थ्यांना लाभ होत नाही असे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे.