रेशन कार्ड हे आता कोणत्याही कामासाठी आवश्यक पुरावा समजला जातो मग आता हे रेशन कार्ड काढायचे आहे का चला तर मग बघू तुमच्यासाठी रेशन कार्ड कसे काढायचे ते हे बातमी तुमच्या फायद्याची ठरणार आहे रेशन कार्ड असल्यावर शासनाच्या नवनवीन योजनेचा लाभ आपल्याला मिळतो तसेच सर्वसामान्य गोरगरिबाला शासनाकडून माफक दरात अन्नधान्य देखील उपलब्ध होते पण या माफक दरातील अन्नधान्यासाठी तसेच त्याचा लाभ घेण्यासाठी आपल्याला रेशन कार्ड हे खूप आवश्यक असते. maharashtra new ration card apply
रेशन कार्डचे वेगवेगळे प्रकार आहेत यामध्ये राज्य सरकार हे राज्यातील वेगवेगळ्या गटात त्यांचे वर्गीकरण करून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे रेशन कार्ड दिले गेलेले आहेत त्यामध्ये पिवळे रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड, अंत्योदय रेशन कार्ड, एपीएल रेशन कार्ड, पांढरे रेशन कार्ड ,हे सर्व रेशन कार्ड चे प्रकार आहेत
रेशन कार्ड मुळे आपल्याला शासनमान्य रेशनच्या दुकानात स्वस्त धान्य मिळते एवढेच नाही तर रेशन कार्डचा वापर शासकीय दस्तऐवज म्हणूनही केला जातो वेगवेगळे शासकीय डॉक्युमेंट्स काढण्यासाठी सुद्धा रेशन कार्डचा वापर केला जातो ओळखीचा पुरावा म्हणूनही याचा वापर केला जातो सध्या राज्यात माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू आहे यासाठी सुद्धा रेशन कार्ड आवश्यक आहे
रेशन कार्ड साठी अर्ज कोठे करावा लागेल
रेशन कार्ड हे जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रातून काढता येते तसेच यासाठी आता ऑनलाईन अर्ज देखील करू शकतो शासनाच्या संकेतस्थळावर भेट देऊन यासाठी ऑनलाईन अर्ज आपण करू शकतो
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आपल्या जवळच्या सुविधा केंद्रात आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन अधिकृत वेबसाईटवर जाऊन रेशन कार्ड साठी अर्ज करता येतो यासाठी अर्ज करताना अर्जदाराला स्वतःला सर्व कागदपत्रे जोडावे लागतात त्यानंतर अर्जदार व्यक्तीला त्याच्या जिल्ह्यातील जिल्हा पुरवठा अधिकारी किंवा अन्नधान्य वितरण अधिकाऱ्याकडे जाऊन एकदा फोटो व्हेरिफिकेशन करून घ्यावे लागते आता आपण कागदपत्रंची थोडक्यात माहिती पाहणार आहोत
कोण कोणते कागदपत्रे लागतात
शिधापत्रिका काढण्यासाठी अर्जदाराला उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला किंवा सातबारा उतारा किंवा लाईट बिल, आणि आपल्या कुटुंबातील ज्या व्यक्तीचे नाव रेशन कार्ड मध्ये टाकायचे आहे त्याचे सर्वांचे आधार कार्ड, तसेच शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र जोडावे लागते तसेच त्यासाठी चलन भरावे लागते
रेशन कार्ड मध्ये जर नव्याने लहान मुलांचे नाव टाकायचे असल्यास त्या मुलांच्या जन्म प्रमाणपत्र किंवा त्यांचे आधार कार्ड तयार झाला जोडून द्यावे लागतात किंवा समजा एखादी नवविवाहित महिलेच्या रेशन कार्ड वरील नाव कमी करून तिला जर सासरच्या रेशन कार्ड मध्ये नाव टाकायचे असेल तर अशावेळी नाव कमी केल्याचा दाखला सादर करून रेशन कार्ड मध्ये या महिलेचे नाव टाकता येते अशाप्रकारे आपल्याला रेशन कार्ड काढण्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची ठरेल.