नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो एक जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या महिलांना सक्षम करण्यासाठी ही योजना कायमस्वरूपी सुरू करणार आहोत. त्याचप्रमाणे महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी योजना फायदेशीर ठरत आहे. maharashtra mukhyamantri mazi ladki bahan yojana new update
17 ऑगस्ट रोजी महिलांच्या खात्यावर पैसे जमा.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या जुलै महिना आणि ऑगस्ट महिना अशा दोन महिन्याचे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यावर 17 ऑगस्ट रोजी वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे आत्तापर्यंत लाखो महिला या योजनेसाठी पात्र ठरले आहेत त्यांच्या खात्यावर लवकरच म्हणजे 17 ऑगस्ट रोजी दोन महिन्याचे पैसे जमा झालेले असणार आहे.
राहिलेल्या अर्ज सादर महिलांचे काय? maharashtra mukhyamantri mazi ladki bahan yojana new update
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या सध्या अर्ज करण्याची प्रोसेस सुरू असून ; अर्जाची तपासणी छाननी प्रक्रिया सुरू असून कागदपत्रावर अभावाने किंवा कागदपत्राच्या चुकीच्या जोडणीमुळे त्यांचे अर्ज रिजेक्ट झाले आहेत. अशा महिला भगिनींसाठी यानंतरच्या प्रोसेस मध्ये जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशी तीन महिन्यांची मिळून साडेचार हजार रुपये त्या पात्र झाल्यानंतर त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.
लेक लाडकी योजना.
महाराष्ट्र शासनाने गरीब घरातल्या मुलींना लखपती करणारी योजना सुरू केल्या असून या योजनेचे नाव म्हणजे लेक लाडकी योजना म्हणजेच लखपती मुलगी योजना सुद्धा म्हटले जाते. या योजनेमध्ये मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तिला एक लाख रुपये मिळेल अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे .