राज्य शासन आपल्या राज्यातील नागरिकांच्या लोक कल्याणासाठी विविध शासकीय योजना राबवित असतात . राज्य शासन यासाठी विविध प्रकारच्या योजना प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न करत असते. माझा आपण महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना (maharashtra government schemes for women’s business) बद्दल माहिती पाहणार आहोत.
विविध योजनांमुळे महिलांना आर्थिक व सामाजिक बळ मिळेल व महिला स्वबळावर स्वतःच्या पायावर उभे राहू शकते आणि त्यांना जे साध्य करायचं आहे ते साह्य करण्यासाठी त्यांना मिळेल अशा प्रकारे राज्य शासन आणि केंद्र शासन योजना राबवत असते. महिला प्रामुख्याने विविध कौशल्यामध्ये पारंगत असतात जसे की भरतकाम विणकाम किंवा शिवणकाम जे ज्यांना आवडेल आणि त्यांना हे काम करायचे असेल ते काम या योजनांच्या माध्यमातून महिला भगिनी करू शकता. maharashtra government schemes for women’s business महिलांसाठी महाराष्ट्रातील विविध योजना यासाठी विविध योजना राबवल्या जातात.
आज महिला वर्ग सुद्धा विविध कार्यक्षेत्रामध्ये आपले स्थान भक्कम करत आहे .पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे विविध कौशल्यामध्ये सुद्धा त्या पारंगत असतात समाजातील मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन या योजनेच्या माध्यमातून बदलण्यास मदत होणार आहे. महिला सुद्धा स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात हे यातून सिद्ध होते.
1) महिला समृद्धी कर्ज योजना maharashtra government schemes for women’s business
महिला समृद्धी कर्ज योजना ही महिलांसाठी व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना व्यवसायाला चालना देण्यासाठी आखण्यात आली आहे. महिला समृद्धी कर्ज योजना भारत सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून महिलांसाठी राबवण्यात येते. महिला संबंधी कर्ज योजनेमध्ये महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी पाच लाख ते वीस लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. महिला समृद्धी कर्ज योजना यामध्ये कर्जाचा व्याजदर हा चार टक्के असतो .कर्ज फेडण्यासाठी एकूण कालावधी हा तीन वर्षाचा असतो. शहरी भागातील व ग्रामीण भागातील महिला बचत गटामार्फत महिलांना कर्ज पुरवठा करणे हा यामागचा मुख्य हेतू आहे.
2) सुकन्या समृद्धी योजना
सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र शासनाची अत्यंत महत्त्वकांशी योजना आहे. ही योजना केंद्र शासनाची अल्पबचत योजना म्हणून ओळखले जाते. या योजनेत 250 ते दीड लाख रुपयापर्यंत तुम्ही गुंतवणूक करू शकता. योजना मुलींसाठी असून यामध्ये दहा वर्षाखाली मुलीचे पालक मुलीच्या नावावर खाते उघडू शकतात. विविध बँक तेव्हा पोस्ट ऑफिस मध्ये सुद्धा आपण मुलींच्या नावे खाते काढू शकता. सुकन्या समृद्धी योजनेमध्ये मुलींच्या नावावर पंधरा वर्षासाठी तुम्हाला पैसे जमा करावे लागणार आहे पंधरा वर्षानंतर तुम्हाला सहा वर्षासाठी पैसे द्यावे लागणार नाही. आणि मुलीचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्यावर व्याजासह हे पैसे मुलीच्या नावावर खाते उघडले आहे तिला ते परत केली जाणार आहे.
3) माझी कन्या भाग्यश्री योजना
मुलींचे जन्मदर वाढवण्यासाठी योजना शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. स्त्री शिक्षणाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये महाराष्ट्रातील कुटुंबातील एका व्यक्तीला दोन मुलींनाच या योजनेचा लाभ देता येणार आहे. या योजनेमध्ये मुलीच्या जन्मानंतर एका वर्षाच्या आत मध्ये पालकांनी नसबंदी करावी लागेल आणि दुसरी मुलगी जन्मल्यापासून सहा महिन्याच्या आत नसबंदी करणे बंधनकारक आहे.maharashtra government schemes for women’s business
4) प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही योजना भारत सरकार केंद्र शासनाकडून राबवली जाते. भारत सरकारकडून सहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. ही एक केंद्र शासनाची महत्त्वाची योजना असून ही योजना महिला आणि बालविकास मंत्रालय मार्फत चालवली जाते.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत सर्व पात्र झालेल्या लाभार्थ्यांना पाच हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जाते आणि राहिलेली रक्कम एक हजार रुपये जननी सुरक्षा योजनेअंतर्गत मातृत्व लाभाच्या अटीवर प्रसुती दिली जाते या योजनेमध्ये एकूण सहा हजार रुपये महिलांना दिले जाते.
5) लेक लाडकी योजना
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली ही योजना आहे. या योजनेमध्ये गरीब आणि आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबातील मुलींना महाराष्ट्र सरकारकडून आर्थिक स्वरूपामध्ये मदत दिली जाते.
महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्पामध्ये 2023 या योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेअंतर्गत गरीब पात्र मुलींना अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर रुपये एकूण 75 हजार रुपये रोख रक्कम दिली जाईल.
6) जननी सुरक्षा योजना
जननी सुरक्षा योजना यामध्ये प्रामुख्याने मुलींचा जन्मदर वाढवणे असून यामार्फत संरक्षण देणे सुद्धा महत्त्वाचे ठरत आहे. देशाचे पंतप्रधान यांनी या योजनेची सुरुवात केली जननी सुरक्षा योजना देशभरातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये शासनाच्या माध्यमातून चालवली जाते दारिद्र रेषेखालील महिलाच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
दारिद्र रेषेखालील महिला यांना सरकारकडून रुपये 1400 आर्थिक मदत दिली जाते याशिवाय आशा सेवकांना प्रसूती प्रोत्सानासाठी 300 आणि प्रसूती नंतर सेवा प्रदान करण्यासाठी 300 रुपये प्रधान केले जाते.
Ayushman Bharat card print आताची दिवाळी साजरी करूया आयुष्यमान भारत संगे
7) महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना
महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून योजना राबवली जाते ही योजना फक्त विधवा महिलांना मिळणार आहे . महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली ही योजना सून या योजनेची सुरुवात जानेवारी 2020 मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू करण्यात आले या. योजनेमध्ये सर्व लाभार्थी महिलांना आर्थिक मदत दिली.
महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना यामध्ये विधवा महिलांना दरमहा सहाशे रुपये दिले जाते . याशिवाय ज्या विधवा महिलांना मुले असतील त्यांना 900 रुपये दिले. जाते या योजनेमध्ये महिलांना दर महिन्याला पैसे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत जमा केले जातात.
8) इतर योजना
पोस्टाच्या माध्यमातून किंवा अन्य संस्थांच्या माध्यमातून सुद्धा महिलांना स्वबळावर उभे राहण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. maharashtra government schemes for women’s business