
mahabhumi – आता सातबारावर मिळणार हीच सुविधा , सरकारचा सातबाराच्या बाबत मोठा निर्णय
नमस्कार शेतकरी मित्रांनो ,
सातबारा उतारा हा mahabhumi या पोर्टलला उपलब्ध होत असतो. त्याचप्रमाणे उमंग ॲप वर सुद्धा तो आपल्याला डाऊनलोड करता येतो. सातबारा उतारा हा शेतीसंबंधी अतिशय महत्त्वपूर्ण कागद आहे . सर्व शासकीय योजना राबवण्यासाठी सातबारा उतारा नक्की मागितला जातो. नुकताच शासनाने सातबारा उतारा बाबत मोठा निर्णय घेतला आहे.
सात बारा उतारावर आता ही सुविधा mahabhumi उपलब्ध करण्यात आली आहे .
आता आपल्याला सातबारा उतारा 24 भाषेत काढू शकता अगदी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सह आणि सोप्या पद्धतीने सातबारा उतारा डाऊनलोड करू शकता.सातबारा उतारा हा mahabhumi पोर्टलवर डाऊनलोड करण्याची सुविधा होती . त्याचप्रमाणे आपल्याला तलाठी कार्यालयाकडे जाऊन त्यांची स्वाक्षरी घेऊन मग तो प्रामाणित करावा लागत होता परंतु यावर उपाय म्हणून शासनाने आता व्हेरिफायर सातबारा उतारे उपलब्ध करून दिले आहे .-त्यामुळे कार्यालयाकडे जाणारा वेळ व खर्चही वाचणार आहे.
शासनाकडून मिळत आहे पशुपालन करण्यासाठी विविध पशु गट वाटप
सातबारा उतारा आता भारतातील एकूण 24 भाषांमध्ये हा उपलब्ध करून देण्यात आहे . केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड ॲक्शन प्रोग्राम यानुसार सातबारा उतारा प्रादेशिक भाषांबरोबर अन्य भाषांमध्ये देखील असावा हे सुचित करण्यात आले आहे . त्यानुसार आता भारतामध्ये सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्य हा बदल करणार आहे . त्यामुळे तुम्हाला आता सातबारा उतारा आपल्या भाषेबरोबर अन्य भाषेत सुद्धा मिळणे शक्य होणार आहे .शासनाच्या या निर्णयानुसार सातबारा उतारा आता पुढील भाषांमध्ये सुद्धा उपलब्ध होणार आहे.
7/12 उतारावर पुढील भाषा उपलब्ध असणार आहे
सातबारा उतारा पुढील 24 भाषेमध्ये उपलब्ध होणार आहे.
मराठी ,हिंदी ,इंग्रजी, बंगाली, गुजराती, मल्याळम ,तेलगू तमिळ ,कन्नड, ओरिया, उर्दू ,असामी, मणिपुरी, नेपाळी, कोकणी, मैथिली, डोंगरी , बोडो, संथाली, सिंधी , संस्कृत , काश्मिरी , आरोबिक काश्मिरी आणि पंजाबी या भाषेमध्ये उपलब्ध होणार आहे.