Lightbill Subsidy शेतकऱ्यांना मिळणार 30 टक्के सवलत
नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये शेती करणे फारच अवघड होऊन जाते .कारण शेती ही सर्वात पाण्यावर आधारित आहे. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वीज बिलामध्ये 33 टक्के सवलत देण्याचा निर्णय राज्य शासनाने आहे .यामुळे 16 महसूल मंडळातील जवळपास दोन लाख शेतकऱ्यांना या सवलतीचा लाभ होणार आहे.
गेल्या वर्षी बीडच्या महसूल मंडळामध्ये 75 टक्के पेक्षा कमी पर्जन्यमान झाले होते .यामुळे सात तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. या क्षेत्रातील शेतकऱ्यांना विविध क्षेत्रात सवलती देण्यात आल्या होत्या .यातच चालू वीजबिलांमध्ये 33 टक्के सवलत देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेला आहे .यामुळे कृषी क्षेत्रातील विज जोडण्यांपैकी दीड लाख शेतकऱ्यांना जवळजवळ 28 कोटी 40 लाख एवढी सवलत प्रदान करण्यात येणार आहे तरी राहिलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.