Land Record on Price | भू नकाशावर आता सातबारा रेडीरेकनर दर ही येणार

WhatsApp Group Join Now
Join Now

नमस्कार मित्रांनो अनेक कामांसाठी आपल्याला सातबारा आवश्यक असतो. सातबारावर आपल्याला अनेक प्रकारच्या नोंदी पाहायला मिळतात. जमीन नोंदणी मध्ये किंवा जमिनीच्या पत्रामध्ये सातबारा हा सर्वात महत्त्वाचा दस्तावेज आहे जमीन किंवा एखादा इमारतीमध्ये फ्लॅटच्या नकाशावर सातबारा उताऱ्यावर आता यापुढे रेडी रेकनर दरही दिसणार आहे.

रेडीरेकनर दर म्हणजे काय ?

रेडीरेकनर रेट हे सर्कल रेट असून ते राज्य सरकार द्वारा भूमी वाणिज्य आणि आवास योजना संपत्ती मूल्यांकन आधारित मूल्य असते. महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेची राज्य शासना द्वारे ठरविण्यात आलेली किमान किंमत म्हणजे रेडी रेकनर दर होय. दरवर्षी त्या त्या भागातील जमिनीचे म्हणजे शेती औद्योगिक रहिवासी भागातील याबाबत झालेल्या संशोधन वरून राज्य शासन हे दर ठरवत असते.

सातबारा उतारा व नकाशावरवर आता दिसणार रेडिरेकनेर दर

राज्यामध्ये नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग अशा स्वरूपाची सुविधा लवकरच उपलब्ध करून देणार आहे . यामुळे जमिनीची खरेदी विक्री करत असताना जमीन किंवा एखादी इमारतीमध्ये फ्लॅट रेडीरेकनर  दर किती आहे ?  हे आता नकाशा किंवा सातबारा उतारा वर दिसणार आहे.  या संदर्भामध्ये राज्य शासनाने डिसेंबर महिन्यामध्ये कोकणातील जिल्ह्यात योजना सुरू करण्याचा विचार केला आहे.  यामुळे नकाशावरून आपल्याला ऑनलाइन माध्यमातून हे दर सहजपणे दिसणार आहे . 

या प्रवर्गातील शेतकऱ्यांना मिळणार पशुखाद्य अनुदान

 

जमिनीचा प्रकार यामुळे समजण्यास मदत होणार

शासनाच्या या योजनेमुळे खरेदी करत असलेले एखादी जमीन कोणत्या प्रकारामध्ये मोडते म्हणजे ती जमीन शहरी भागातील एखाद्या इमारतीची फ्लॅट दृशमान  पद्धतीने आपल्याला पाहता येणार आहे .  त्याचप्रमाणे खरेदी करण्यात येणारे जमीन तेव्हा आपल्या कोणत्या झोनमध्ये आहे ?  याची आपल्याला खातरजमा सुद्धा करण्यास मदत होणार आहे. संबंधित गटाचा नकाशा रेडीरेकनर दर व सातबारा असल्यास आपल्याला जमीन खरेदी पूर्व खातरजमा आहे करता येणार आहे.

Leave a Comment