land map maharashtra आपल्याला जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा?

WhatsApp Group Join Now
Join Now

land map maharashtra :- नमस्कार शेतकरी बंधूंनो , आज आपण आपण आपल्या शेत जमिनीचा नकाशा कसा पाहायचा याची संपूर्ण माहिती या लेखातून पाहणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवट पर्यंत  काळजीपूर्वक वाचावा .

बऱ्याचे वेळेला आपल्याला  शेत जमिनीचा नकाशाची land map maharashtra आवश्यकता असते . मात्र शेत जमिनीचा नकाशा मिळवण्यासाठी आपल्याला शासकीय कार्यालयाला खेटे मारावे लागतात.  आणि पैसा आणि वेळ हे दोन्हीही खर्च होतात आणि मात्र हाती काही लागत नाही मात्र आता आपण हे सर्व ऑनलाईन पद्धतीने आपल्या मोबाईलवर कशा पद्धतीने पाहिजे याची माहिती पाहणार आहोत.

जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी काय  करावे ?   land map maharashtra

शेत जमिनीचा नकाशाचे काम आपल्या तेव्हाच पडते जेव्हा आपल्याला आपल्या शेतात जाण्यासाठी रस्ता किंवा जमिनीची हद्द पाहिजे असेल .तेव्हा किंवा अन्य कारणासाठी आपल्या शेतीचा नकाशा या गोष्टीची आवश्यकता पडते. तर आपल्या मोबाईलवर शेतीचा नकाशा कसा पाहिजे याची प्रोसेस पुढील प्रमाणे.

ऑनलाइन जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा .

त्यानंतर तुम्ही नकाशा पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईटला https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/27/index.html जाणार आहात.

जमिनीचा नकाशा ऑनलाईन पाहण्यासाठी लिंक आता आपल्यासमोर महाभूमी अभिलेख ही महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट ओपन झालेली आहे .

kcc card apply चक्क बँक देत आहे , शेतकऱ्यांना एक लाख 60 हजार रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज फक्त ‘हे’ कार्ड काढा.

ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईल मधून क्रोम सेटिंग मध्ये जाऊन desktop मोड हा ऑन करायचा आहे .

जेणेकरून आपल्याला नकाशा मोठ्या साईज मध्ये दिसेल .

आता आपल्याला खाली फोटो दिल्याप्रमाणे तीन आडव्या रेषा दिसत असतील

जमिनीचा नकाशा
              जमिनीचा नकाशा

त्यावर क्लिक करून तुमचा जिल्हा तालुका व गाव निवडायचे आहे.

यानंतर स्ट्रेट कॅटेगिरी डिस्ट्रिक्ट तालुका विलेज आणि मॅप त्यानंतर प्लॉट नंबर इत्यादी माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला आपले नाव त्या ठिकाणी दिसणार आहे आणि सर्च करायचे आहे.

प्रत्येक पर्याय निवडल्यानंतर आपल्यालााा थोडा वेळ लागणार आहे आणिि सर्व भरून झाल्यावर आपल्याला ऑटोमॅटिक आपल्या्या्या्या मोबाईलवर आपल्या गावाचा नकाशा दिसणार आहे.

ई-नकाशा प्रकल्प काय? land map maharashtra 

भूमि अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील कार्यालयात वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे साठवून ठेवलेले आहेत . या नकाशांच्या आधारे जमिनीच्या हददी व विविध माहिती  कायम करण्याचा निर्णय घेतला जातो. यामुळे ही नकाशे फार महत्वाचे असतात .

पण, हे नकाशे फार वर्षांपूर्वी म्हणजेच 1880 पासून तयार केलेले असल्यामुळे ते अत्यंत नाजूक स्थितीत आहेत. त्यामुळे त्यांना डिजिटल digital स्वरुपात उपलब्ध करून देण्यासाठी ई-नकाशा हा प्रोजेक्ट हाती सरकारनं हाती घेतला आहे.

तालुका स्तरावरील उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील फाळणी नकाशे, भूसंपादन नकाशे, बिनशेती नकाशे इ. नकाशांचं डिजिटायजेशन land map maharashtra करण्यात येत आहे.

त्यामुळे डिजिटल 7/12 , 8 -अ यासोबतच जनतेला आता डिजिटल नकाशाही ऑनलाईन पद्धतीनं पाहता येणार आहे.land map maharashtra

Leave a Comment