ladki bahin yojana status check maharashtra माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे 19 ऑगस्टला मिळणार , पहा आपला अर्ज कुठपर्यंत आले.

WhatsApp Group Join Now

नमस्कार शेतकरी आणि बंधू आणि भगिनींनो आज आपण लाडकी बहिणी योजना याविषयी माहिती पाहणार आहोत. राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी एक जुलै 2024 रोजी घोषणा केली होती व त्याप्रमाणे 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यावर दरमहा दीड हजार रुपये जमा केले जाणार आहे. आतापर्यंत या योजनेसाठी राज्यभरातून एक कोटी 25 लाख इतके अर्ज आले असून त्यापैकी 25 लाख अर्ज हे पात्र ठरले आहे.

लाडकी बहीण योजनेच्या घोषणांचा दररोज हजारोंच्या संख्येने महिला मोबाईल ॲप वर, पोर्टलवर आपला अर्ज सादर करत आहे. त्यामुळे ही लोकप्रिय होत चाललेली योजना महिलांसाठी त्यांच्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत करणारे ठरणार आहे.

आपल्या अर्जाची स्थिती जाणून कशी घ्यायची

तुम्ही ज्या पोर्टलवर आपला अर्ज भरला होता त्या पोर्टलवरनं आपल्या मोबाईल नंबर च्या साह्याने आपला अर्ज मंजूर झाला की रिजेक्ट झाला की हे सुद्धा पाहू शकता . यासाठी नारीशक्ती दूत ॲप चा वापर करू शकता किंवा माझी लाडकी बहीण योजना पोर्टल सुद्धा सुरू झाले आहे तिथे ते अर्जाची स्टेटस पाहिजे असून त्यानुसार आपल्या अर्जाची सद्यस्थिती पाहू शकता.

जर तुम्हाला तुमच्या अर्ज स्टेटस मध्ये Approved असे दाखवत असेल तर तुमचा यशस्वीपणे सबमिट झाला असून आता तुम्ही या योजनेसाठी पात्र झाला आहे.

Pending for approval  जर आपला अर्जात असा पर्याय येत असेल तर आपला अर्ज अजून वेटिंग मध्ये आहे तो तपासणी साठी प्रतिक्षा यादीमध्ये दाखवत आहे. तर आपला अर्ज लवकरच तपासणी करण्यात येईल.

महिलांच्या खात्यावर पैसे कधी जमा होणार

लाडकी बहीण योजनेमध्ये साधारणपणे एक जुलैपासून महिलांच्या खात्यावर दीड हजार रुपये जमा केले जाणार आहे. साधारणपणे रक्षाबंधनच्या निमित्ताने हे पैसे जमा होणार आहे . यासाठी 19 ऑगस्ट रोजी हे पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी आपल्या अर्जदार यशस्वीपणे तपासणी झाला असेल मंजूर झाला असेल तर सुरुवातीला आपल्या खात्यावर एक रुपया जमा केला जाणार आहे . आपल्या खात्याची ही तांत्रिक पडताळणी केली जाणार आहे आणि त्यानंतर आपल्याला दरमहा दीड हजार रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून दिले जाणार आहे . ऑगस्ट महिन्यामध्ये जुलै व ऑगस्ट या दोन महिन्याचे अशी मिळून तीन हजार रुपये महिलांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे त्यामुळे जर आपला अर्ज झाला. तर त्यानंतर एक रुपया जमा होईल आणि एक रुपया जमा झाल्यानंतर आपल्याला शासनाच्या नियमानुसार पैसे जमा केले जाणार आहे.

Also Read  pm kisan yojana registration पंतप्रधान किसान योजना नोंदणी करण्यासाठी 'या' स्टेप्स फॉलो करा.

Leave a Comment