मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना; निकषात बसणाऱ्या महिलांनाच दिला जाणार लाभ?
नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरला ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना. या योजनेमध्ये विधानसभेमध्ये महायुती सरकारला स्पष्ट बहुमत देण्यात आले. आतापर्यंत महिलांना साडेसात हजार रुपये म्हणजेच एकूण पाच हप्ते देण्यात आले आहे डिसेंबर महिन्याची म्हणजे सहाव्या हाताची महिलांना प्रतीक्षा आहे. ladaki bahin yojana maharashtra application status check
निकषानुसार देणार लाभ. ladaki bahin yojana maharashtra application status check
राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये लाडके बहिणी योजनेत निकष असणाऱ्या महिलांनाच लाभ देण्यात येणार असून 2100 रुपये देणे विषयी शासन विचार करण्यात येईल असे सुद्धा वक्तव्य केला आहे.
मुख्यमंत्री लाडके बहिणी योजनेमध्ये कागदपत्रांची पूर्तता करत असताना महिला व कुटुंबांना कागदपत्र जमा करण्यास अत्यंत धावफळ उडाली होती. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी आर्थिक शोषण करण्याची उदाहरणे पाहावयास मिळाली आहे.
लाडकी बहिणी योजनेच्या अर्जांची होणार छाननी
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेली योजना फक्त पाच महिन्यांमध्ये जवळपास दोन कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला होता .यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धती वापरण्यात आलेल्या होत्या यासाठी अंगणवाडी सेविकांना ऑफलाईन अर्ज घेऊन ते पुन्हा ऑनलाईन करण्याचे आदेश देण्यात आलेले होते . यामध्ये जेवढे अर्ज मंजूर झाले . त्या सर्व महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार प्रमाणे रक्कम जमा करण्यात आलेली होती. मात्र यामध्ये निकषात बसणाऱ्या महिलांना या अर्जाचा विचार केला जाणारा असून त्यामुळे लाडक्या बहिणीने भरलेल्या सर्व अर्जाची आता छाननी सुरू होणारा असून कागदपत्रांची पूर्तता न केलेल्या अनेक महिलांची नावे या योजनेतून वगळले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे त्यामुळे छाननी प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्र असणे आवश्यक ठरणार आहे.