राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी एक अत्यंत आनंददायक निर्णय घेतला आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ अंतर्गत आता पात्र महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी ४०,००० रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे. चला तर मग, या योजनेबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना – काय आहे नवीन?
या योजनेअंतर्गत सध्या पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये दिले जातात. यामध्ये आता आणखी ६०० रुपयांची वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. म्हणजेच, एकूण २,१०० रुपये दरमहिना लाभार्थी महिलांना मिळणार आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच माहिती दिली की, या योजनेच्या लाभार्थी महिलांना आता व्यवसाय सुरू करण्यासाठी ४०,००० रुपयांचे कर्ज देण्यात येईल. ही योजना विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
कर्जाची परतफेड कशी होणार?
हे कर्ज लाडकी बहिण योजना अंतर्गत दरमहा मिळणाऱ्या हप्त्यातून हळूहळू परतफेड केले जाणार आहे. म्हणजेच, महिलांना अतिरिक्त आर्थिक ओझं न येता त्यांनी घेतलेले कर्ज हप्त्यांमधून सहज फेडता येईल.
कोणत्या महिलांना होईल फायदा?
या योजनेच्या आधीपासून लाभार्थी असलेल्या महिलांना प्राधान्य
ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना विशेष लाभ
महिला स्वतःचा घरगुती व्यवसाय, जसे की शिवणकाम, किराणा दुकान, मसाले बनवणे इत्यादी सुरू करू शकतील
लाडकी बहीण कर्ज योजना – कार्यपद्धती कधी जाहीर होणार?
या योजनेची अंमलबजावणी कशी केली जाईल, त्याबाबत लवकरच शासनाकडून स्पष्ट कार्यपद्धती जाहीर करण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र मार्गदर्शक सूचना देखील काढल्या जातील.
महत्वाच्या नोंद
या योजनेतून महिलांना केवळ आर्थिक मदत नव्हे, तर स्वावलंबन आणि उद्योजकतेचा आत्मविश्वास मिळणार आहे. त्यामुळे ज्या महिलांनी अजूनही अर्ज केलेला नाही, त्यांनी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा जवळच्या महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधावा.