Kisan Credit Card – नमस्कार शेतकरी बंधूंना आज आपण किसान क्रेडिट कसे उपलब्ध करावे याची माहिती पाहणार आहोत. साधारणताा बाजारामध्ये अनेक बँकेचे क्रेडिट कार्ड असतात उदाहरणार्थ hdfc credit card , sbi credit card ,axis bank credit card ,icici credit card ,flipkart axis bank credit card,bob credit card ,my card hdfc indusind bank या सर्वांचे क्रेडिट कार्ड आपल्याला काही अटी व शर्ती ठेवून लगेच प्राप्त होतात मात्र किसान कर्ज पोर्टल द्वारे आपल्याला किसान क्रेडिट कार्ड प्राप्त करायचे आहे याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत.
किसान क्रेडिट कार्ड kisan credit card काय आहे हेतू
किसान क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून शेतकरी त्यांच्या कृषी उद्योगासाठी किंवा त्यांच्या गरजांसाठी अत्यंत स्वस्त दरात कर्ज घेऊ शकतात . या क्रेडिट कार्ड द्वारे मिळणारे कर्ज सवलतेच्या व्याजावर दिले जातात . जे शेतकरी किसान क्रेडिट कार्ड द्वारे कर्ज घेऊन वेळेवर परतफेड करतात त्यांना विशेष सवलत ( Low interest) देखील दिले जाते
किसान क्रेडिट कार्ड kisan credit card चा वापर कसा कराल ?
kisan credit card किसान क्रेडिट कार्ड ही योजना फक्त शेतकऱ्यांसाठी राबवली जाते शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत लागली तर ते या माध्यमातून सहजपणे कर्ज काढून आपली शेती विषयक गरज पूर्ण करू शकतील हा यामागचा सर्वात महत्त्वाचा हेतू होय. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खते कीटकनाशक बियाणे किंवा शेतीची उपकरणे खरेदी करण्यासाठी मदत होते. किसान क्रेडिट कार्ड द्वारे शेतकऱ्यांना कोणत्याही हमीशिवाय दीड लाख रुपयांचे कर्ज दिले जाते . हे कर्ज शेतकऱ्यांनी कमी व्याजदरात परतफेड करायचे आहे . शेतकरी तीन वर्षात पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात.
व्हेरिफाय केलेले सात बारा फक्त 5 मिनिटांत डाउनलोड करा
ज्याप्रमाणे इतर credit card validity म्हणजे वैधता असते त्याचप्रमाणे किसान क्रेडिट काढले तर सुद्धा पाच वर्षाचे मर्यादा देण्यात आलेले आहे. म्हणजे आपल्याला पाच वर्षाच्या कालावधीत हे वापरता येते पुन्हा याची मुदत आपल्याला वाढून घ्यायची असते .ज्या शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड आहे त्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण आली असता या credit आपली गरज भागवू शकता .कोणत्याही गावातील सावकाराकडे पैसे मागण्याची आवश्यकता राहत नाही व कमी व्याजदर असल्यामुळे ते आपण वेळेवर परत करू शकतो
kcc card किसान क्रेडिट कार्ड हे साधारण एखाद्या एटीएम कार्ड प्रमाणे असते.किसान क्रेडिट कार्ड आपण पाच वर्षात तीन लाख रुपयांपर्यंत अल्प मुदतीचे कर्ज घेऊ शकतात. शेतकऱ्यांना 9 टक्के दराने कर्ज मिळते. मात्र सरकार त्यावर 2 टक्के अनुदान देते . यानुसार त्यावर 7 टक्के व्याजदर होत असते .जर शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जाची परतफेड केली तर त्यांना आणखी 3 टक्के सूट दिली जाते अशा प्रकारे कर्जावर फक्त 4 टक्के व्याज (lowest intrest rate) भरावे लागते.
kisan credit card किसान क्रेडिट कार्ड कसे काढावे ?
किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम पीएम किसान या वेबसाईटवर जावे लागेल ती पुढील प्रमाणे येथे किसान क्रेडिट कार्ड चा अर्ज आपल्याला डाऊनलोड करावा लागेल. साधारणतः Kisan Credit Card FORM असा फॉर्म डाऊनलोड करून घ्या. या अर्जात तुम्हाला जमिनीची कागदपत्रे आणि पिकाची माहिती भरावी लागणार आहे.जर तुम्ही इतर बँक किंवा इतर शाखेकडून दुसरे कोणते किंवा किसान क्रेडिट कार्ड बनवले आहे की नाही हे सुद्धा त्यात नमूद करावे लागेल. अर्ज भरल्यानंतर तो आपल्याला जमा करावा लागेल त्यानंतर संबंधित बँकेकडून आपल्याला किसान क्रेडिट कार्ड kisan credit card yojana दिले जाणार आहे.