kanda chal mahadbt कांदा चाळ योजना माहिती 2024
नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो ,साधारणपणे कांदा काढली नंतर तो शेतामध्ये त्याचे ढिग लावून किंवा पारंपारिक पद्धतीने तयार झालेला कांदा साठवला जातो . मात्र साठवलेला कांदा खराब होऊ नये यासाठी शेतकरी तो कांदा लगेच मार्केटमध्ये नेतो . त्यामुळे कांद्याला बाजारात जो भाव असेल तोच प्राप्त होतो आज आपण कांदा चाळी विषयी माहिती पाहणार आहोत.
कांदा चाळीमध्ये शास्त्रीय दृष्ट्या उभारली केली तर कांद्याची योग्य ती गुणवत्ता व टिकाऊ पणा टिकवता येतात व कांदा नुकसानीपासून शेतकऱ्यांचं होणारं नुकसान सुद्धा कमी करता येणार आहे. मात्र कांदा चाळ ऊभी करण्यासाठी भांडवल आवश्यक असतं आणि त्यामध्ये खर्चही असतो त्यामुळे कांदा जाळीकडे खर्च न करता तो पारंपरिक पद्धतीने साठवला जातो.
कांदा चाळीसाठी कसे आर्थिक मदत केली जाते.kanda chal mahadbt
साधारणपणे कांदा चाळीसाठी 5 , 10 , 15 ,20 , 25 मॅट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळ उभारणीसाठी येणाऱ्या एकूण खर्चाच्या 50% किंवा कमाल रुपये 3500 प्रति मेटरियल याप्रमाणे अर्थसहाय्य दिले जाते यामध्ये 25 टन पर्यंत कमाल मर्यादा पर्यंत अनुदान दिले जाते.
लाभार्थी कसे कसे निवडले जातात त्याचे निकष
शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत आपला अर्ज सादर करताना स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे व त्यासाठी सातबारा उतारा आणि त्यावर कांदा पिक याची पिक नोंदणी आवश्यकता आहे.
शेतकऱ्यांनी त्याच्या शेतामध्ये कांदा पीक असणे आवश्यक आहे.
कांदा चाळ अनुदान मिळविण्यासाठी ऑनलाइन पोर्टल
शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये लाभ घेताना वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकरी किंवा शेतकऱ्यांचा गट बचत गट स्वयंसहाय्यता गट नोंदणीकृत शेतीसंबंधी संस्था शेतकरी सहकारी संस्था इत्यादी या योजनेचा लाभ घेता येईल
ऑनलाइन नोंदणी करत असताना कोणती कागदपत्र आवश्यक आहे
- सातबारा उतारा
- 8अ उतारा
- आधार कार्डची झेरॉक्स प्रत
- आधार सिंडिंग असलेले बँक पासबुक झेरॉक्स
- जातीचे प्रमाणपत्र (अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती) साठी
- यापूर्वी कोणत्या योजनेतून कांदा चाळीस अनुदान लाभ घेतला नसल्याबाबत शेतकऱ्याचे हमीपत्र
अर्ज कोठे सादर करावा
- सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी https://hortnet.gov.in/ या ऑनलाइन संकेतस्थळावर आपली नोंदणी करावी.
- शेतकऱ्यांनी त्यांची नोंदणी हार्ट नेट प्रणालीवर अर्ज केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याकडे आवश्यक वरील कागदपत्र सादर करावी.
- तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून पूर्वसंमती मिळाल्यानंतर कांदा चाळ उभारणीचे काम सुरू करावे.
- दोन महिन्याच्या आत कांदा चाळ उभारणे आवश्यक आहे.
सदर योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून अधिक माहिती जाणून घेऊ शकता.