नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो केंद्र शासन महिलांसाठी नवनवीन योजना कधी असते. महिलांना उद्योजक क्षेत्रामध्ये सक्रिय सहभागासाठी व स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी, सक्षमीकरणासाठी खास महिलांसाठी केंद्र सरकारकडून उद्योगिनी योजना सुरू करण्यात आली आहे.
उद्योग क्षेत्रात कृषी क्षेत्राशी किंवा अन्य कोणतेही क्षेत्र असो महिला प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटत आहे .केंद्राच्या सूचनेनुसार अनेक बँकांनी महिलांना व्यवसाय करण्यासाठी मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकायला सुरुवात केली आहे . आज आपण उद्योगिनी योजनेविषयी माहिती पाहणार आहोत. त्याला तर करूया सुरुवात.
उद्योगिनी योजना स्वरूप interest free loan to women
उद्योगिनी योजना मध्ये बँकेच्या माध्यमातून राबवली जात आहे. या योजनेच्या अंतर्गत महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळत आहे . यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासन प्रयत्नशील आहे. महिलांना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्वावलंबी करण्यासाठी ही योजना अत्यंत लाभदायक ठरत आहे.
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार बँकांनी खास महिलांसाठी सुरू केलेली ही योजना आहे . या योजनेमध्ये कोणतेही तारण न ठेवता म्हणजे विनातारण म्हणजेच काही गहाण न ठेवता महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होते. यातून महिलांना होण्यास मदत होणार आहे.
उद्योगिनी योजनेसाठी अर्ज कोणत्या बँकेत करावा?
उद्योगिनी योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्याला राष्ट्रीयकृत बँक आणि खाजगी बँक अशा दोन्ही बँकेमध्ये अर्ज उपलब्ध आहे. त्यामुळे आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण या बँकेत मार्फत अर्ज करू शकता.
उद्योगिनी कर्ज कोणत्या कामासाठी मिळते?
महिलांसाठी जे उद्योगिनी पाच लाख रुपये कर्ज आहे ते आपण कोणकोणत्या कामासाठी म्हणजे व्यवसायासाठी वापरू शकतो ते पुढील प्रमाणे;
या योजनेच्या अंतर्गत बांगड्या बनवणे व्यवसाय, ब्युटी पार्लर, बेडशीट आणि टॉवेल बनवणे, बाइंडिंग ,नोटबुक बनवणे, कॉफी चहा बनवणे ,कापूस धागा उत्पादन ,रोपवाटिका ,कापड व्यवसाय, दुग्ध व्यवसाय आणि पोल्ट्री संबंधित व्यवसाय, सुक्या मासळीचा व्यापार ,खाद्यतेलाचे दुकान ,नायलॉन बटन उत्पादन , जुने पेपर आर्ट , पापड निर्मिती इत्यादी व्यवसायासाठी आपल्याला पाच लाख रुपये कर्ज उपलब्ध होत आहे.
उद्योगिनी कर्ज योजनेसाठी आवश्यक कागदपत्र?
- अर्जासोबत पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
- आधार कार्ड
- दारिद्र रेषेखालील व्यक्तींचे रेशन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला
- जन्म दाखला
- जात प्रमाणपत्र
- बँक खाते इत्यादी.
कमी व्याजात महिलांना तीन लाख रुपये कर्ज
महिलांसाठी केंद्राने आणलेले योजना म्हणजे महिलांना उद्योगिनी योजनेअंतर्गत अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती तसेच शारीरिक दृष्ट्या विकलांग असलेल्या महिलांना सुद्धा बिनव्याजी कर्ज उपलब्ध होणार आहे. हे कर्ज तीन लाख रुपये पर्यंत असणार आहे.
योजनेचे निकष पात्रता
या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी निकष पुढीलप्रमाणे आहे.
- या योजनेचा लाभ फक्त महिला उमेदवारांना मिळणार आहे.
- महिला उमेदवारांची वयोगट श्रेणी 18 ते 55 इतकी आहे.
- महिला कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दीड लाख असून महिला व्यवसाय मालक होण्यास पात्र आहे.
अशाप्रकारे केंद्र शासनाकडून राबविण्यात येणारी महिलांच्या व्यवसायासाठी त्यांना तीन लाखापासून पाच लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध होत आहे. महिलांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी आणि समाजामध्ये आपला कामाचा ठसा उमटणे उमटण्यासाठी ही योजना फायदेशीर ठरत आहे.