girls scholarship maharashtra पाचवी ते दहावीच्या मुलींसाठी शिष्यवृत्ती योजना

WhatsApp Group Join Now
Join Now

girls scholarship maharashtra पाचवी ते दहावीच्या मुलींसाठी शिष्यवृत्ती योजना

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो , मुलींची उपस्थिती वाढावी. त्याचप्रमाणे मुलींना शाळेमध्ये शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी. त्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी शासन वेगवेगळ्या योजना राबवत असते .आज आपण पाचवी ते दहावीच्या मुलींसाठी शाळा स्तरावर शासनामार्फत राबवणाऱ्या योजनांविषयी माहिती पाहणार आहोत.

मागासवर्गीय समाजातील मुलींचे प्राथमिक शिक्षण व शाळेतील गळतीचे प्रमाण कमी करण्याच्या हेतूने समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना राबवली जाते या योजनेमध्ये इयत्ता पाचवी ते सातवी विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील मुलींना वर्षाला सहाशे रुपये तर आठवी ते नववीतील अनुसूचित जातीतील मुलींना एक हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. 2003-04 पासून इयत्ता आठवी व दहावीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या विमुक्त जाती व भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गासह ही योजना सुरू करण्यात आली. यामध्ये जून ते मार्च असे दहा महिने शंभर रुपये प्रमाणे 1000 रुपये शिष्यवृत्ती विद्यार्थिनींच्या खात्यावर वर्ग केली जाते.

या योजनेतील अटी व शर्ती

या योजनेमध्ये सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेमध्ये जिल्हा परिषद नगरपालिका ,महानगरपालिका ,अनुदानित , विनाअनुदानित प्राथमिक माध्यमिक शाळा.

शाळेतील मागासवर्गीय मुलींसाठी असून यामध्ये उत्पन्नाची अट राहणार नाही .

शाळेमध्ये 75 टक्के उपस्थिती गरजेची आहे.

अर्ज कधी व कोठे सादर करावा

ऑनलाइन माध्यमातून अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी संकेतस्थळावर या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अर्ज भरून सदर प्रस्ताव समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे सादर करायचा आहे.

शिष्यवृत्तीची रक्कम ही मुलींच्या बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने जमा केली जाते.

यासाठी राष्ट्रीयकृत बँकेमध्ये मुलींचे खाते असणे आवश्यक आहे त्यामुळे रक्कम जमा करण्यास कोणती अडचण येत नाही.

Leave a Comment