नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींना विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शासन विविध योजना करत असते. या योजनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांचं आवडीचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. आजच्या या लेखांमध्ये आपण कोणत्या योजनेतून विद्यार्थ्यांना टॅब मिळत आहे .याविषयी माहिती पाहणार आहोत चला तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचा.
JEE , NEET , MH-CET या स्पर्धकात्मक परीक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाजोती नागपूर यांच्या माध्यमातून मोफत प्रशिक्षण व विविध सवलत देण्यात येत आहे.
JEE , NEET , MH-CET स्पर्धा परीक्षा मोफत प्रशिक्षण
JEE , NEET , MH-CET या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना डॉक्टर इंजिनिअर होण्याची स्वप्न पूर्ण होण्यासाठी शासनाच्या माध्यमातून या परीक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे व अर्थसहाय्य मिळावे यासाठी प्रयत्न करत असते.
फॉर्म भरण्यासाठी पात्रता
- विद्यार्थी हा अकरावी सायन्स मध्ये यावर्षी प्रवेश घेतलेला असावा.
- विद्यार्थ्याला दहावी मध्ये कमीत कमी 60 टक्के गुण प्राप्त असायला पाहिजे.
- विद्यार्थी हा पुढील जात प्रवर्गातील असावा.OBC , VJ ,NT-B , NT-C , SBC.
महा ज्योती अंतर्गत योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- जात प्रमाणपत्र
- अधिवास प्रमाणपत्र
- नॉन क्रिमिलाइस प्रमाणपत्र
- दहावी मार्कशीट
- अकरावी प्रवेश पावती
- मोबाईल नंबर
- ईमेल
- फोटो व सही
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर (मह ज्योती) यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक तयारी करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची अंतिम तारीख की 10 ऑगस्ट 2024 पर्यंत ठेवण्यात आलेले आहे तर विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपली नोंदणी करावी.
म्हाज्योती अंतर्गत योजनेचे स्वरूप
JEE , NEET , MH-CET या परीक्षेची तयारी करण्यासाठी महा ज्योती तर्फे मोफत पुस्तके
JEE , NEET , MH-CET या परीक्षांची तयारी करण्यासाठी महा ज्योती तर्फे मोफत टॅब
महा ज्योती तर्फे मोफत रोज ६ जीबी डाटा