प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आता वैद्यकीय उपचारासाठी पाच लाख रुपये पर्यंत इलाज मोफत Free medical Treatment केला जाणार आहे. याबाबतची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भंडारा येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमात दरम्यान केली आहे.
महात्मा फुले जन आरोग्य योजना यामध्ये अनेक अटी घालण्यात आल्या होत्या त्यामुळे इलाज घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते . आता महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील सगळ्या अटी काढून टाकल्या असून यामध्ये रेशन कार्ड ची सुद्धा आठ असणार नाही . त्याचप्रमाणे उत्पन्नाची अट यामध्ये असणार नाही याबाबत सुद्धा माहिती देण्यात आली. Free medical Treatment
केंद्र शासनाच्या आयुष्मान भारत योजना आणि राज्य शासनाची महात्मा फुले जन आरोग्य योजना (Free medical Treatment) या योजना मध्यंतरीच्या काळामध्ये एकत्रित करण्यात आले.या बाबत राज्य शासनाने शासन निर्णय काढून याबाबतच्या मार्गदर्शक सूचना सुद्धा सांगितल्या होत्या.
राज्यातील नागरिकांना आता यापुढे पाच लाख रुपये पर्यंतचे उपचार हे मोफत केली जाणार आहे. याबाबत आपल्याला आयुष्यमान भारत योजनेचे आभा कार्ड काढून घेणे गरजेचे ठरणार आहे .