नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो राज्य शासनाने यापूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना याविषयी घोषणा केलेली होती. या योजनेअंतर्गत 7.5 एचपी पर्यंत शेती कृषी पंपांना पाच वर्षासाठी मोफत वीज पुरवठा करणार आहे. त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू करण्यात आलेले आहे मात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यापूर्वी काही गोष्टी पूर्ण कराव्या लागणार आहे. त्याविषयी हा लेख पाहणार आहोत. free electricity to farmers
मोफत वीज पुरवठा मिळवण्यासाठी काय करावे लागेल?
शेतकऱ्यांनी जर एप्रिल 2024 पूर्वी ज्या शेतकऱ्यांकडे वीज बिल थकित आहे त्यांना नक्कीच बिलाची रक्कम मात्र भरण्याविषयी सूचना महावितरण विभागाने स्पष्ट केलेले आहे. यामुळे अशा शेतकऱ्यांना मागील थकीत विज बिल हे भरावे लागणार आहे.
मुख्यमंत्री बळीराजा मोफत विज योजना
राज्य शासनाचा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना विषयी घोषणा करण्यात आलेले आहेत या योजनेला 25 जुलै 2024 रोजी शासन मान्यतासुद्धा या योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. 7.5 एचपी पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना मोफत वीज या योजनेतून मिळणार आहे. त्याचप्रमाणे एप्रिल ते जुलै या चार महिन्यातील कोणत्याही रुपयांचे वीज बिल सुद्धा शासनाने माफ केलेली आहे.
मोफत वीज कालावधी किती पर्यंत आहे?
शेतकऱ्यांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत विजय योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी साधारणपणे एप्रिल 2024 ते मार्च 2029 हा कालावधी ठेवण्यात आलेला आहे पावसावर आधारित आहे. सध्या पाऊस हा लहरी स्वरूपात आहे. त्यामुळे शेतीचे सुद्धा यामुळे खूप नुकसान होत असते त्यातच अशा योजनांमुळे शेतकऱ्यांना नक्कीच थोडा आर्थिक भार कमी होण्यास मदत होत आहे.