नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो सध्या राज्यामध्ये 48 लाख इतके कृषी पंप ग्राहक आहे .या सर्व ग्राहकांना महावितरण कंपनीच्या माध्यमातून वीस पुरवठा केला जातो या ग्राहकांपैकी फक्त 16% कृषी ग्राहक असून एकूण वापरावे ३० टक्के वापर हा कृषी क्षेत्रासाठी केला जातो. त्याचप्रमाणे संपूर्ण राज्यामध्ये शेतीसाठी शेतकऱ्यांना कृषी पंपांना रात्रीच्या काळात 10 ते 8 तास विजेची उपलब्धता करून दिले जाते. राज्यामध्ये पडणारा अवकाळी पाऊस दुष्काळाची स्थिती यामुळे शेतकऱ्यांवर एक आर्थिक संकट आलेले आहे.
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 स्वरूप
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना 7.5 HP पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना एप्रिल 2024 पासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजना 2024 सुरू करण्यात आलेली आहे.
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 कालावधी कोणता?
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना याचा कालावधी साधारणतः पाच वर्षासाठी देण्यात आलेला आहे. सदर योजनेमध्ये पाच वर्षासाठी म्हणजे एप्रिल 2024 ते मार्च 2019 पर्यंत ही योजना राबवण्याबाबत मान्यता देण्यात आलेले आहे. मात्र तीन वर्षाच्या कालावधीमध्ये या संदर्भामध्ये आढावा घेऊन या योजनेबाबत योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे.
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना पात्रता
महाराष्ट्र राज्यातील 7.5 HP पंपांना मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेसाठी पात्र ठरणार आहे.
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना अंमलबजावणी
या योजनेमध्ये एप्रिल 2024 पासून 7.5 HP पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना मोफत वीज देणार आहे.
मागेल त्याला सौर कृषी पंप देण्याचे धोरण यापूर्वी शासनाकडून ठरवून दिलेले आहे.
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना शासन निर्णय
शासनाच्या विद्युत अधिनियम 2003 कलम 65 नुसार कोणत्याही ग्राहकाला अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदान लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहे त्यानुसार विज बिल माफ केल्यानंतर सदर वीजदर सवलती पोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रीम स्वरूपात वर्ग करण्यात येणार आहे.
तर अशाप्रकारे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना राज्यामध्ये राबविण्यात येत आहे 2024 पासून साडेसात एचपी कृषी पंप असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.