नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो सध्या खरीप हंगाम सुरुवात सुरू आहे. खरीप हंगामामध्ये आपल्या सातबारा उताऱ्यावर आपल्या शेतातील पिकाची नोंद होणे आवश्यक आहे. सातबारावर जर आपण वस्तुनिष्ठ ,अचूक व पारदर्शक नोंद होण्यासाठी राज्य शासनाने ही ई पीक पाहणी हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे.
ती ई पिक पाहणी (E pik pahani last date 2024 ) कार्यक्रम हा 1 ऑगस्ट पासून सुरू करण्यात आला आहे. 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर पर्यंत शेतकरी स्वतःहून आपल्या मोबाईलवर ई पीक पाहणीच्या साह्याने आपल्या पिकाची नोंद अद्यावत करू शकतात. राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकाची नोंद ही सातबारावर घेणे आवश्यक आहे . यापूर्वी अशा नोंदी तलाठी करत होते . मात्र नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत राज्य शासनाने ही ई पाहणी उपलब्ध करून दिलेले आहे. त्यावरून शेतकरी आपल्या शेतामध्ये उभे असलेल्या पिकाची नोंद व फोटो घेऊ शकतो . त्यामुळे शेतातील उभ्या पिकाची अगदी अक्षांश व रेखांश आधारित छायाचित्रासह नोंद होत आहे. या नोंदीनुसार तलाठी आपापल्या गावातील सत्यता पडताळणी करून पीक नोंदी सातबारावर अंतिम करत आहेत.
ई पीक पाहणी कशी करावी? E pik pahani last date 2024
ई पीक पाहणी नोंदणी 2024 (E pik pahani last date 2024 )
सर्वात प्रथम आपल्याला प्ले स्टोर वरून ई पीक पाहणी वर्जन दोन हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करायचे आहे.
ई पीक पाहणी नोंदणी 2024 (E pik pahani last date 2024 ) डाउनलोड लिंक
ई पीक पाहणी हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड झाल्यानंतर आपल्याला पीक क्षेत्रात जाऊन आपले गाव निवडून ,आपला गट क्रमांक निवडून वैयक्तिक नोंदणी करून पिकाची माहिती अक्षांश व रेखांश त्याचा फोटो काढून अपलोड करायचा आहे.
ई -पीक पाहणीचा उपयोग काय? E pik pahani
ई पीक पाहणीचा उपयोग म्हणजे जर आपण पिक विमा घेतला असेल जर अतिवृष्टी किंवा अन्य कारणामुळे आपल्या पिकाचे नुकसान झाले असेल तर आपल्याला नुकसान भरपाईसाठी आपल्या सातबारा उतारा वर पीक पाहणी नोंद असते आवश्यक आहे.
ई पीक पाहणी शेवटची तारीख किती आहे?
E pik pahani Last Date
शेतकऱ्यांना पीक पाहणी करण्यासाठी कालावधी हा एक ऑगस्ट 2024 ते 15 सप्टेंबर 2024 म्हणजे 45 दिवस असा कालावधी देण्यात आलेला आहे.