WhatsApp Group
Join Now
नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो सध्या ई पिक पाहणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. १ ऑगस्ट पासून सुरू झालेली ही प्रक्रिया साधारणपणे १५ सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या हाती असून आपल्या शेतामध्ये जी पीक आहे त्याची नोंद करण्याची ही शेवटची मुदत आहे.
ई पीकपाहणी मोबाईल मध्ये करण्यासाठी आपल्या सर्वात प्रथम प्लेस्टोर वरून हे ॲप डाऊनलोड करायला पाहिजे आणि मग आपल्यालाही ई पिक पाहणी करायला सोपे जाणार आहे.
पिक पाहणी नोंद अशी करा. e pik pahani app
- गुगल प्ले स्टोअर मध्ये जाऊन ही ई पिक पाहणे डीसीएस हे मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करा.
- महसूल विभाग निवडा व लॉगिनची पद्धत म्हणून शेतकरी म्हणून लॉगिन करा.
- स्वतःचा मोबाईल नंबर टाका व विभाग निवडा त्यानंतर जिल्हा , तालुका व गाव निवडा.
- पहिले, मधले, आडनाव किंवा खाते क्रमांक गट क्रमांक यानुसार आपला खाते क्रमांक निवडा व तपासून घ्या.
- खातेदाराचे नाव निवडा व सांकेतांक भरा.
- होम पेज वर आल्यानंतर आपल्याला पिकाची माहिती नोंदवा हा पर्याय निवडायचा आहे.
- आता खाते क्रमांक निवडा व गट क्रमांक किंवा भूमापन क्रमांक निवडा.
- जमिनीचे एकूण क्षेत्र दर्शविला जाईल व पोट खराबा सुद्धा दाखवला जाईल.
- आता आपल्याला शेतीचा हंगाम निवडून पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र हेक्टर आर व पिकाचा वर्ग निवडा.
- एक पीक असेल तर निर्मळ पीक निवडा आणि एकापेक्षा जास्त पिकांसाठी बहुपीक निवडा.
- पिकाच्या प्रकार व पिकाची किंवा झाडांची नावे निवडा लागवड क्षेत्र भरा.
- जलसिंचनाची साधने निवडा जलसिंचन पद्धत निवडा लागवडीच्या दिनांक भरा व पुढे या पर्यायावर क्लिक करा.
- फोटो काढा फोटो काढत असताना पाहणी साठी निवडलेल्या गटामध्ये असल्याची खात्री करा.
- आता सर्व माहिती भरल्यानंतर माहिती ची खात्री करा व घोषणा पत्रावर टिक करा व आपला अर्ज सबमिट करा.
- आपण जर नेटवर्क मध्ये असल्यास माहिती अपलोड होईलच मात्र जर आपण नेटवर्कमध्ये नसल्यास होमपेज वरील अपलोड बटन दाबून आपली माहिती अपलोड करा.
- अशा प्रकारे आपल्याला पीक पाहणी पूर्ण करायची आहे.