शेतजमिनीची मोजणी स्थिती ऑनलाइन पाहा | e Mojani Status Check करा

WhatsApp Group Join Now

शेत जमीन मोजणी अर्जाची स्थिती e mojani status ऑनलाइन कशी पहावी – संपूर्ण मार्गदर्शक

शेतकरी किंवा जमीनधारक जेव्हा आपल्या जमिनीची मोजणी करून घेण्यासाठी अर्ज करतात, तेव्हा त्यानंतर मोजणी अर्जाची स्थिती काय आहे, तो कोणत्या टप्प्यात आहे, हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे असते. परंतु अनेक शेतकऱ्यांना याविषयी अचूक माहिती नसते. परिणामी त्यांना तहसील कार्यालय, जिल्हा कार्यालय याठिकाणी वारंवार चकरा माराव्या लागतात आणि वेळ व पैशाची नासाडी होते.

म्हणूनच आज आपण पाहणार आहोत की, जमीन मोजणीसाठी केलेल्या अर्जाची स्थिती e mojani status आपण घरी बसून ऑनलाइन पद्धतीने कशी पाहू शकतो.

आजच्या डिजिटल युगात बहुतांश कामे मोबाईलवरच सहजपणे होऊ शकतात. मात्र आवश्यक माहितीच्या अभावामुळे अनेक वेळा आपला वेळ, श्रम आणि पैसा वाया जातो. खरंतर काही गोष्टी खूपच सोप्या असतात, पण योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने आपण त्या समजून घेण्यात अपयशी ठरतो. म्हणूनच, चला या माहितीची सुरुवात करूया सोप्या आणि उपयुक्त पद्धतीने!

e mojani status मोजणी केलेल्या अर्जाची स्थिति कशी पहाल?

सर्वात प्रथम, आपल्याला मोजणीसाठी नेहमी शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागते. वेबसाईटची लिंक खालील प्रमाणे असून, ती क्लिक करून उघडता येते:

e mojani status मोजणी अर्ज स्थिति पाहण्यासाठी शासनाची वेबसाइट 

ही वेबसाईट प्रामुख्याने खालीलप्रमाणे दिसते.

e mojani status वेबसाइट

यामध्ये “Check mojani Application Status” ( e mojani status ) नावाचा टॅब दिसतो. त्याचा इंटरफेस खालीलप्रमाणे आहे.

e mojani status

या पेजवर आपल्याला जिल्हा, तालुका, गाव आणि मोबाईल क्रमांक भरायचा आहे. त्यानंतर आपण ज्या मोजणीसाठी अर्ज केला आहे, त्या अर्जाचा क्रमांक, गट नंबर किंवा सर्वे नंबर आणि संबंधित वर्ष निवडायचे आहे.

संपूर्ण माहिती काळजीपूर्वक व व्यवस्थित वाचून, अचूक भरावी.

Also Read  free aadhar card update आधार कार्ड बाबत अपडेट करण्यासाठी केंद्र शासनाचा मोठे घोषणा

यानंतर, एक चौकोनात कॅप्चा कोड दिसेल. तो जसाच्या तसा खालच्या रकान्यात भरायचा आहे. त्यातील एकही अक्षर चुकवायचे नाही.

कॅप्चा कोड भरल्यानंतर, “Check Mojani Status” या टॅबवर क्लिक करायचे आहे.

या पद्धतीने आपण आपल्या मोजणी अर्जाची स्थिती पाहू शकतो.

यामध्ये पुढील माहिती मिळते:

  • अर्जाची सध्याची स्थिती काय आहे

  • अर्ज कोणाकडे प्रलंबित आहे

  • मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव व त्यांचा मोबाईल क्रमांक

  • इतर संबंधित तपशील

अशा प्रकारे जमिनीच्या मोजणीसाठी अर्ज केल्यानंतर त्याची स्थिती तपासण्यासाठी अनेक शेतकरी आणि जमीन मालकांना वेळोवेळी सरकारी कार्यालयांचे फेरे मारावे लागतात. मात्र, आता शासनाने उपलब्ध करून दिलेल्या अधिकृत वेबसाईटवरून आपण ही माहिती सहजपणे ऑनलाइन पाहू शकतो. या प्रक्रियेत फक्त आवश्यक माहिती भरून, काही सोप्या स्टेप्सनंतर आपण अर्जाची स्थिती, संबंधित अधिकारी आणि त्यांच्या संपर्काची माहिती मिळवू शकतो. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांची मोठी बचत होते. ही सुविधा सर्वांसाठी उपयुक्त असून, प्रत्येक शेतकऱ्याने आणि नागरिकाने याचा योग्य वापर करावा, हीच अपेक्षा.

Leave a Comment