Business Loan Schemes for Women महिला व्यवसायिकांना उद्योगिनी योजनेद्वारे महिलांना या व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज व 30 टक्के अनुदान सविस्तर माहिती जाणून घ्या

WhatsApp Group Join Now

नमस्कार भगिनींनो महिलांना आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहणे तसेच त्यांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळणे यासाठी आपले सरकार कायम पुढे असते आणि यासाठी शासनाकडून विविध योजना राबवण्यात येतात

त्यापैकी एक योजना म्हणजे उद्योगिनी योजना अशी आहे या योजनेच्या माध्यमातून आपल्या देशातील महिलांना तीन लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते आणि महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम होता यावे यासाठी ही शासनाच्या वतीने उद्योगिनी योजना ही एक अत्यंत महत्त्वाकांशी अशी मांडली जाते

उद्योगिनी योजनेची वैशिष्ट्ये

  • उद्योगिनी योजनेअंतर्गत सर्वात गरीब निराधार विधवा अनुसूचित जाती जमाती तसेच शारीरिक दृष्ट्या विकला असलेल्या महिलांना प्राधान्य देऊन या योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्ज दिले जाते
  • इतर महिलांना मात्र त्यासाठी अत्यल्प व्याज द्यावे लागणार

  • महिलांना तीन लाखापर्यंत कर्ज दिले जाते
  • वय वर्ष 18 ते 55 या वयोगटातील महिला उद्योजक शेती तसेच किरकोळ अशा प्रकारच्या लघु उद्योगांमध्ये कर्जाची सोय केली गेलेली आहे
  • या योजनेची वैशिष्ट्य लाभार्थ्याला कर्जामध्ये 30 टक्के अनुदान देण्यात येते
  • या योजनेच्या माध्यमातून महिलांना खाजगी व्यवसाय उभारण्याची संधी मिळणार आहे

पात्रता

  • अर्जदार एक महिला असावी.
  • अर्जदाराचे कौटुंबिक उत्पन्न व साधारण आणि विशेष श्रेणीतील दीड लाखापेक्षा कमी असावे.
  • विधवा आणि अपंग महिलांसाठी कौटुंबिक उत्पन्नावर मर्यादा नाही.
  • अर्जदाराचे वय हे 18 ते 55 दरम्यान असावे.
  • अर्जदाराने आपल्या मागील कोणत्याही आर्थिक कर्जावर डिफॉल्ट केलेला नसावे.

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना पासपोर्ट आकाराचे फोटो
  • आधार कार्ड

  • जन्म दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • रेशन कार्ड
  • जात प्रमाणपत्र
  • बँक पासबुक झेरॉक्स

कोणत्या व्यवसायासाठी मिळणार कर्ज

उद्योगिनी योजनेअंतर्गत कोणत्या उद्योगासाठी कर्ज मिळू शकते हे बघूया यामध्ये बेकरी, सौंदर्य प्रसाधन केंद्र, दुकान, साडी, अगरबत्ती उत्पादन, रास्त भाव दुकान, पिठाची गिरणी, स्टेशनरी ,इत्यादी व्यवसायांचा समावेश करण्यात आलेला आहे या योजनेमध्ये तसेच ही उद्योगिनी योजना लघु व्यवसाय क्षेत्रातील व्यावसायिक, तसेच किरकोळ विक्रेते, उत्पादक ,स्वयंरोजगार, व्यावसायिक व्यापारासाठी अधिकाधिक तीन लाखापर्यंतचे कर्ज हे पुरवले जाते

Also Read  MSRTC Bus Tracking System मोबाईलवर कळणार एस टी बसचे लाईव्ह लोकेशन कुठे थांबली आहे ? आणि कुठपर्यंत पोहोचेल ?

अर्ज प्रक्रिया कशी करावी

व्यवसाय कर्जासाठी अर्ज करण्यासाठी अर्जदाराने सर्व आवश्यक कागदपत्रासह आपल्या जवळच्या बँकेला भेट देऊ शकतो. कर्जाचा अर्ज मंजूर झाल्यानंतर कर्जाची ही रक्कम अर्जदाराच्या बँक खात्यात किंवा थेट पुरवठा दाराच्या खात्यात यंत्रसामग्री, उपकरणे किंवा कोणत्याही भांडवली खर्चासाठी वितरित केली जाते. त्याचप्रमाणे सारस्वत बँक बजाज फायनान्स सारख्या खाजगी संस्था देखील उद्योगिनींसाठी कर्ज देतात.

Leave a Comment