Budget 2024 शेतकऱ्यांना 9000 रुपये, महिलांना 10,000 ते 12,000 रुपये , महिला व शेतकरी वर्गाला मिळवार दिलासा ?
Budget 2024 चालू आर्थिक वर्षामध्ये भारत सरकार अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्या एक फेब्रुवारी रोजी अंनतिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडे देश व त्यांची लक्ष लागून राहिले आहे . साधारणतः हा अर्थसंकल्प निवडणुकीपूर्वी सरकारकडून कोणकोणत्या मोठ्या घोषणा केल्या जातील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिला आहे.
पीएम किसान निधी योजनेचा हप्ता वाढणार Budget 2024
सरकार बजेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारे योजना आखत असते. नवीन माहितीनुसार शेतकऱ्यांना 9000 रुपये म्हणजेच पी एम किसान निधी योजनेचा हप्ता वाढवण्यात संदर्भात निर्णय होऊ शकतो . केंद्र सरकार पंतप्रधान किसान सन्माननीय योजनेमध्ये 9000 रुपयांपर्यंत वाढ करू शकते. सध्या पी एम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात.
महिला वर्गाला मिळवार 12000 रुपये ?
महिला वर्गाला आकर्षित करण्यासाठी मोदी सरकार महिलांना पीएम किसान फंडातून दहा हजार ते बारा हजार रुपये देऊ शकतात . सध्या देशभरामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेतून देशभरातील 11 कोटी शेतकऱ्यांना वर्षासाठी 3000 रुपये दिले जातात ; तर याच योजनेतून महिला शेतकऱ्यांना शेतीत अधिक सहभागी होण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय असू शकतो. आता या संदर्भात आपल्याला विशेषता एक फेब्रुवारी रोजी अधिकृत माहिती प्राप्त होणार आहे.