PM KISAN SANMAN NIDHI INSTALLMENT राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता पीएम किसान योजना व नमो शेतकरी सन्मान निधी योजना या दोन योजनेचा लाभ आता एकाच वेळी मिळणार आहे. पीएम किसान निधी योजनेचा सोळावा हप्ता व शेतकरी महासन्माननिधी योजनेचा हप्ता आहे आज म्हणजेच 28 फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान सन्माननीय योजनेचा हप्ता हस्तांतरित म्हणजे डीबीटी च्या माध्यमातून आणि राज्य सरकारकडून सुद्धा याबाबत मोठी भेट देण्यात येणार आहे.
प्रथमच केंद्र व राज्य शेतकरी सन्मान निधीचे हप्ते एकाच वेळी. PM KISAN
पी एम किसान सन्मान निधी योजना यांचा 16 insatament म्हणजे ( डिसेंबर 23 ते मार्च 24) या चार महिन्याचा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ येथील समारंभ कार्यक्रमात वितरित केला जाणार आहे . तो हप्ता दोन हजार रुपये असा हप्ता आहे व नमो सन्माननिधी योजनेअंतर्गत दुसरा व तिसरा हप्ता असे मिळून चार हजार रुपये म्हणजेच शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. यासाठी राज्यभरातील सुमारे 90 लाख शेतकरी यासाठी पात्र ठरले आहे. यासाठी केवायसी प्रक्रिया जर आपली पूर्ण केली असेल तर आपल्याला हप्ता वितरित करताना काही अडचणी येणार नाही.