नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो नुकताच केंद्र शासनाचा बजेट 2024 सादर करण्यात आला आहे. यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील जमिनी बाबत रिफॉर्म साठी महत्वपूर्ण अशी धोरण आखण्यात आलेले आहे . ग्रामीण भागातील जमिनीसाठी युनिक आयडिफिकेशन नंबर किंवा आधार आणि सर्व नागरिक जमिनीच्या नोंदीचे डिजिटल डायजेशन म्हणजे सर्व नोंदी डिजिटल करण्याचा प्रस्ताव करण्यात आलेला आहे. आजच्या लेखामध्ये आपण त्याविषयी माहिती पाहणार आहोत. Bhu-Aadhar land adhaar card
काय आहे भू आधार? Bhu-Aadhar land adhaar card
भू आधार योजने अंतर्गत ग्रामीण भागातील सर्व जमिनींना आता 14 अंकी युनिक आयडिफिकेशन नंबर दिला जाणार आहे. ज्याप्रमाणे आपल्याला आधारला बारा अंकी क्रमांक देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे आता जमिनीला सुद्धा 14 अंकी एक युनिक नंबर दिला जाणार आहे . जो भू आधार म्हणून ओळखला जातो . ज्याप्रमाणे आधार मध्ये सर्व माहिती सामाविष्ट केलेल्या असते त्याचप्रमाणे जमिनीची ओळख ही साठी हा क्रमांक त्याच प्रमाणे जमिनीत संबंधी सर्व माहिती देणार आहे . यामध्ये जमिनीची मालकी व शेतकऱ्यांच्या रजिस्ट्रेशन मॅपिंग करण्यात येणार आहे. यामुळे जमिनीत संदर्भात अनेक अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. भारतातील भूमी अभिलेखांचे डिजिटल डायजेशन होण्यासाठी एकात्मिक भूमी अभिलेख व्यवस्थापन प्रणाली तयार करण्यासाठी सन 2008 मध्ये एक महत्त्वकांशी प्रकल्प सुद्धा सुरू केला होता.
भू आधार योजनेमुळे कोणते फायदे होणार?
- या योजनेमुळे जमिनीला एक 14 अंकी क्रमांक मिळणार असल्यामुळे जमिनीची मालकी स्पष्ट होणार आहे.
- जमिनीत संदर्भातील वाद सुद्धा मिटण्य स मदत होणार आहे.
- जमिनीची ओळख क्रमांक प्राप्त झाल्यामुळे विविध योजनांचा लाभ घेताना हा क्रमांक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
- शेती संबंधित काम आहे म्हणजे कृषी कर्ज घेणे रजिस्ट्रेशन करणे पीक पेरणी इत्यादीसाठी हा क्रमांक महत्वपूर्ण ठरणार आहे.
- भुस्तरीय मॅपिंग आणि मोजमाफा द्वारे अचूक जमिनीचे मोजमाप होऊन नोंदी अधिकच निश्चित होतील.
- भूखंडाच्या ओळखीबाबत ज्या अडचणी होती म्हणजे ओळखण्यास कठीण जात होते त्यामुळे जमिनीचे अनेक वाद व्हायचे ते आता मिटण्यास मदत होईल.
- आधार कार्ड लिंक करून जमिनीच्या नोंदी ऑनलाइन करता येणार आहे.
- भूखंडाचे संबंधित संपूर्ण इतिहास म्हणजे फेरफार वगैरे आणि मालकी संबंधी माहिती ट्रॅक करता येणार आहे.
- या अत्याधुनिक प्रणालीमुळे शासनाला जमीन धोरण आखण्यासाठी जमिनीची अचूक माहिती आकडेवारी प्राप्त होईल.
भू आधार प्रणाली कशी काम करणार?
- भूखंडाचे नेमके मोजमाप होण्यासाठी सर्वात प्रथम जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करून भूखंड जिओ टॅग केला जातो.
- त्यानंतर सर्वर प्रत्यक्ष पडताळणी करून भूखंडाच्या चतु :सीमा आणि जमिनीची हद्द निश्चित करतील .
- भूखंडासाठी जमीन मालकाचे नाव क्षेत्रफळ आणि त्या संदर्भातली प्रकार आहे जमिनीचा ती माहिती गोळा करतील व ऑनलाइन जमा केली जाईल.
- एकत्र केलेले सर्व माहिती या प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने भूमी अभिलेख व्यवस्थापन प्रणालीमध्ये जमा केली जाणार आहे.
- भूमी अभिलेख व्यवस्थापन प्रणालीमध्ये ज्यावेळी आपण सर्व माहिती जमा करून सर्व प्रोसेस झाल्यानंतर 14 अंकी आधार क्रमांक तयार होतो व तो डिजिटल रेकॉर्डची जोडला जाणार आहे.