महाराष्ट्र राज्यामध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगारांना विविध योजना राबवल्या जातात यातील महत्त्वपूर्ण योजना म्हणजे अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत कामगारांना घरकुल बांधण्यासाठी सुमारे दोन लाख रुपयांचे आर्थिक अर्थसहाय्य देण्यात येते बांधकाम कामगार घरकुल योजना कागदपत्रे कोण कोणती लागतात याबाबत आपण माहिती पाहणार आहोत आपण जर बांधकाम कामगार असाल तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
प्रस्तुत लेखामध्ये आपण बांधकाम कामगार घरकुल योजना कागदपत्र याविषयी माहिती पाहणार आहोत चला तर करू सुरुवात.
अटल बांधकाम कामगार घरकुल योजना कागदपत्रे पुढीलप्रमाणे :-
1. ओळखपत्र – ( महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने दिलेले )
2. बँक खात्याचे पासबुक
3. रहिवासी पुरावा – ( खालील पैकी कोणतेही एक कागदपत्र )
- रेशन कार्ड
- आधार कार्ड
- ड्रायव्हिंग लायसेन्स
- ग्रामपंचायत रहिवासी दाखला
- मागील महिन्याचे वीज बिल
4. अर्ज (ठराविक नमुन्यातील)
5. स्वयंघोषणापत्र – महाराष्ट्रामध्ये स्वतःचे पती किंवा पत्नीच्या नावावर सिमेंटचे पक्के बांधकाम केलेले घर नसल्याचे.
6. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये पात्र आहे असे सक्षम अधिकाऱ्याचे पत्र.
7. प्रधानमंत्री आवास योजनेत नाव असलेली प्रमाणित यादी
8. शासकीय ठेकेदाराकडे काम केल्याचे 90 दिवसाचे प्रमाणपत्र
9. जन्माचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला)
10. महानगर पालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
11. ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
12.पासपोर्ट आकारातील 3 फोटो
13.कायमचा पत्ता पुरावा
14.ई-मेल आयडी
15.मोबाईल नंबर
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम क्षेत्रातील मजुरांची नोंदणी केली जाते आणि त्यांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधित कामगारांची अधिकृत नोंदणी आवश्यक आहे.
नोंदणीसाठी पात्र कामगार:
-
इमारत व रस्त्यांचे बांधकाम करणारे कामगार
-
दगड कापणारे, फोडणारे, व दगडाचा चुरा करणारे
-
फरशी बसविणारे कामगार
-
गटार व नळजोडणीचे काम करणारे
-
बंधारे, बोगदे, पूल बांधणारे
-
सुतारकाम, लोहारकाम, इलेक्ट्रिक काम करणारे
-
तसेच बांधकामाशी संबंधित इतर प्रकारची कामे करणारे मजूर
बांधकाम कामगार घरकुल योजना कागदपत्रे नमुने यातील कागदपत्रे आपण डाउनलोड करून आपला अर्ज पूर्ण करू शकता.
बांधकाम कामगार घरकुल योजना कागदपत्रे अर्ज – डाउनलोड करा.
शासकीय ठेकेदाराकडे काम केल्याचे 90 दिवसाचे प्रमाणपत्र ग्रामसेवकाच्या सहीचे 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र नमूना डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
अधिक माहितीसाठी
तुम्ही इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता.
किंवा
मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
किंवा
1800-233-2233 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून अधिक माहिती जाणून घेऊ शकता.