नमस्कार शेतकरी बंधू बांधकाम कामगार योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना गृह उपयोगी 30 भांडी देण्यात येतात या संदर्भामध्ये आपण यापूर्वी माहिती पाहिलेली आहे.
बांधकाम कामगार योजनेमध्ये नोंदणीकृत केलेल्या कामगारांना आतापर्यंत या योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. ज्या कामगारांनी आपली नोंदणी पूर्ण केलेली आहे अशाच कामगारांना या योजनेचा लाभ घेता येतो.
मोफत गृहपयोगी वस्तू योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला बांधकाम कामगार नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे.
बांधकाम कामगार योजना कधी सुरू होणार आहे?
सध्या आचारसंहिते मुळे या योजनेमध्ये लाभ द्यायचे राहिलेले आहे मात्र राज्य शासनाकडून लवकरच या संदर्भामध्ये घोषणा करण्यात येणार आहे . त्यामुळे प्रथम आपल्याला आपली कामगार नोंदणी करून मगच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. पहिला लाभ मिळाला असेल तर आपल्याला या योजनेमध्ये दुसरा लाभ घेता येणार नाही.
पुन्हा आपल्याला भांड्यांचे किट पाहिजे असेल तर ते आपल्याला पाच वर्षानंतर पुन्हा ही प्रक्रिया करून प्राप्त होऊ शकते.
जर आपण या योजनेमध्ये तर या योजनेचा लाभ जर भेटला नसेल तर आचारसंहिता संपल्यानंतर आपल्या योजनेचा लाभ नक्की दिला जाणार आहे.