banana insurance scheme केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी विमा संरक्षित रकमेत वाढ
नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो राज्य शासनाने केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला असून आज आपण त्या विषयी माहिती पाहणार आहोत.
राज्यामध्ये शेती करत असताना नेहमी येणारे नैसर्गिक संकट शेतीमालाला न मिळणारा भाव अशा अनेक संकटांना शेतकरी वर्ग हा तोंड देत असतो .केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने त्यांना दिलासा देणार आहेत . निर्णय घेतला असून हवामान आधारित फळ पिक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाईच्या विमा संरक्षित रकमेमध्ये वाढ करण्याचा महत्त्व पूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
कृषी व पशुसंवर्धन विभागाकडून याबाबत शासन निर्णय काढण्यात आला असून 2024-25 या वर्षांतर्गत वर्षांतर्गत हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे.
नुकसान भरपाई पुढीलप्रमाणे वाढ करण्यात आली
साधारणपणे नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यामध्ये हिवाळ्यातील कमी तापमानामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास त्यांना हेक्टरी 32 हजार 119 रुपयांचे नुकसान भरपाई दिली जाणार यापूर्वी ती भरपाई रक्कम 26500 इतकी होती.
एप्रिल महिन्यात सरासरी तापमान जास्त असते यांनी कशामध्ये पात्र झालेले शेतकऱ्यांना आता 42 हजार पाचशे रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे यापूर्वी ती 35000 इतकी दिली जायची.
मे महिन्यात सलग पाच दिवस 85 अंश तापमान राहिला जाताना नुकसान भरपाईची रक्कम ही 52 हजार 821 इतके करण्यात आली ती जुन्या निकषानुसार 42 हजार इतकी होती.
गारपीट व वादळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास आता हेक्टरी 85 हजार रुपयांची नुकसान भरपाई रक्कम दिली जाणार आहेत ती यापूर्वी 1ल70000 इतकी होती.
शेतकऱ्यांच्या भीमा हप्त्याची रक्कम ही कमी झाली
शेतकरी हवामान आधारित फळ पिक विमा काढणार आहेत त्याची विमा ची रक्कम कमी होणार आहे 2023 24 साठी हेक्टरी 10500 इतकी रक्कम होती ती आता आठ हजार पाचशे इतकी करण्यात आली.