ayushman-bharat-yojana-2024 : आयुष्मान भारत योजना! सरकारने बदलले नियम, ‘या’ आजारांवर मिळणार नाही मोफत उपचार

WhatsApp Group Join Now

काही वर्षापासून आपल्या भारत सरकारने आयुष्यमान भारत ही मेडिकल संदर्भातली योजना राबवत आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र झालेल्या नागरिकांना आता पाच लाख रुपयापर्यंत उपचार हे मोफत देण्यात येत आहेत . मात्र या आयुष्यमान भारत योजनेमध्ये भारत सरकारने काही नियमाने बदल केला आहे . आज आपण त्या नियमांविषयी या लेखांमध्ये माहिती पाहणार आहोत. Ayushman Bharat Yojana 2024

      नुकताच भारत सरकारने या संदर्भामध्ये एक यादी जाहीर केले आहे.  या यादीमध्ये आपल्याला आयुष्यमान भारत योजनेमध्ये कोणत्या आजाराचा समावेश केला जाणार नाही हे त्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे. 

या योजनेतील काही महत्त्वपूर्ण गोष्टी ( Ayushman Bharat Yojana 2024 )

  • या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड प्रदान केले जाते. 
  • योजना धारक लाभार्थ्याला पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार मिळतात. 

आता “या” रोगांचा समावेश होणार नाही. ayushman-bharat-yojana-2024

आयुष्यमान भारत योजनेतून सरकारने 196 खाजगी रुग्णालयातून उपचारातून काढून टाकले आहेत .  यामध्ये मलेरिया , मोतीबिंदू ,सर्जिकल डिलिव्हरी, नसबंदी आणि गॅंगरिंग यासारख्या आजार यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार नाही त्याचा परिणाम आता जनतेवर विपरीत होणार आहे. 

मात्र सरकारी रुग्णालयात मिळणार उपचार

शासनाने 196 खाजगी रुग्णालयातून वगळणे असले तरी सरकारी रुग्णालयामध्ये याबाबत उपचार मिळणार आहे. म्हणजेच जरी आपल्याला खाजगी रुग्णालयात उपचार मिळाले नसले तरी सरकारी रुग्णालयात उपचार घेऊ शकतात .  त्यामुळे आयुष्यमान भारत योजनेचा लाभार्थी सरकारी रुग्णालयात जाऊन याबाबत उपचार घेऊ शकतो.

या योजनेमध्ये कोण लाभार्थी लाभ घेऊ शकतात ? 

आयुष्मान भारत योजना आणि महाराष्ट्र शासनाची महात्मा फुले  जन आरोग्य योजना या दोन्ही योजना महाराष्ट्र राज्यामध्ये एकत्र करण्यात आले आहे . त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी योजना लागू करण्याबाबत सुद्धा घोषणा झाली आहेत. 

Also Read  सात बारा उतारावरील महत्वाच्या नोंदी

Leave a Comment