ayushman bharat card आयुष्यमान भारत कार्ड काढा आणि मिळवा पाच लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार

WhatsApp Group Join Now
Join Now

ayushman bharat card आयुष्यमान भारत कार्ड काढा आणि मिळवा पाच लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार

नमस्कार मित्रांनो , शासनाच्या वतीने 2018 पासून आयुष्यमान भारत योजना ही मोफत वैद्यकीय उपचार करण्यासाठी राबविण्यात येते . या योजनेमध्ये गोरगरीब गरजू रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध व्हावे यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे . या योजनेच्या माध्यमातून नागरिकांची नोंदणी करून त्यांना आयुष्यमान भारत कार्ड म्हणजे आबा कार्ड हे दिले जाते यासाठी शासनाचा आरोग्य विभाग कार्यरत असतो. ayushman bharat card

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून आयुष्यमान भारत योजना 2018 मध्ये सुरू करण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून कुटुंबातील सर्वांसाठी प्रत्येकी पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.  त्यासाठी आपल्याला शासकीय रुग्णालय खाजगी रुग्णालय मध्ये सुद्धा उपचार होण्याची हमी देण्यात आलेली आहे.

आयुष्मान भारत योजनेमध्ये एकूण 1356 असे विविध आजारांवर आपल्याला उपचार करण्यात येतात . यासाठी आपल्याला आपल्या कुटुंबाचं आयुष्यमान भारत कार्ड असणे अत्यंत गरजेचे आहे.

आयुष्यमान भारत कार्ड कोठे काढावे?

जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये तसेच अंगीकृत केलेले खाजगी रुग्णालयामध्ये आपल्याला आयुष्यमान कार्ड काढण्याची सुविधा ही त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे.

गाव पातळीवर जर आयुष्यमान भारत कार्ड काढायचे असेल तर ,आपल्याला ग्रामपंचायत ऑपरेटर रेशन कार्ड दुकानदार प्राथमिक आरोग्य केंद्र उप आरोग्य केंद्र किंवा आशा वर्कर यांच्याकडेही आयुष्यमान भारत कार्ड काढता येते तर ग्रामीण भागातील लोकांनी या ठिकाणी चौकशी करून आपले आयुष्यमान भारत कार्ड नक्की काढावे.

आयुष्मान भारत कार्ड काढण्यासाठी कोण कोणते कागदपत्र लागतात?

आयुष्मान भारत कार्ड काढण्यासाठी आपल्याला आयुष्यमान भारतपत्र ,रेशन कार्ड , आधार कार्ड इत्यादी कागदपत्र लागतात.

आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी स्वतः ती व्यक्ती हजर असणे आवश्यक आहे.

तर अशाप्रकारे आपल्याला जर आपण वेळेवर आपल्या कुटुंबाच जर आयुष्यमान भारत काढले तर आपल्याला जवळजवळ चौदाशे आजारांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी कुठेही धावपळ करण्याची गरज नाही. कारण आपल्याकडे आयुष्यमान भारत कार्ड आहे त्याचप्रमाणे नागरिकांना हे कार्ड काढण्याविषयी आरोग्य विभागांना आवाहन करण्यात आले आहे तर लवकरच हे आयुष्मान भारत कार्ड काढावे व आपल्या कुटुंबाचं आरोग्याची आपण अशा प्रकारे काळजी घेणार आहोत.

Leave a Comment